Dainik Rashi Bhavishya Updates : आज प्रदोष व्रत सुद्धा असणार आहे. प्रदोष व्रताचे महत्व शिवपुरणात सांगण्यात आले आहे. शुक्रवारी येणाऱ्या प्रदोष व्रताला शुक्र प्रदोष व्रत असे म्हणतात. या दिवशी महादेवाची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात.तर मेष ते मीन राशीसाठी आजचा दिवस काय नवीन घेऊन येणार हे आपण जाणून घेऊया…
आजचे राशिभविष्य लाईव्ह ५ सप्टेंबर २०२५ : Daily horoscope live updates in Marathi
वृश्चिक सप्टेंबर राशिभविष्य (Scorpio September Horoscope 2025)
कर्तृत्वाला निस्वार्थीपणाची साथ मिळाली तर ते काम आकाशावढे मोठे होते. असेच काहीसे सत्कर्म आपल्या हातून घडेल. पूर्वजांच्या स्मृती प्रित्यर्थ पितृपक्षात समाजकार्याला हातभार लावाल. विद्यार्थी वर्ग एकाग्रतेने अभ्यासावर लक्ष केंद्रीत करेल. गुरु बल नसल्याने अधिकाधिक मेहनत घ्यावी लागेल. नोकरी व्यवसायात सध्या तरी नवे प्रयोग नको. वरिष्ठ आपली बाजू समजून घेतील. स्वतःला सिद्ध करण्याची सुवर्ण संधी मिळेल. विवाहितांनी एकमेकांचा आदर करावा आणि एकमेकांशी सुसंवाद साधावा. घर, वाहन यांची खरेदी विक्री करताना प्रलोभनांना भुलू नका. अशा वेळी तज्ज्ञांचे मार्गदर्शन कामी येईल. गुंतवणूकदारांचा आलेख वरखाली होत असल्याने शाश्वत लाभ होणार नाही. डोक्यात वैचारिक गोंधळ झाल्याने निर्णय घेणे कठीण जाईल. डोकं जड होईल. नवरात्रात नवा मार्ग सापडेल.
मिथुन, सिंहसह 'या' ५ राशींचे लोक असतात सर्वांचे आवडते शिक्षक; घडवतात विद्यार्थ्यांचं भविष्य, तुम्हीही या राशीचे आहात का?
तूळ सप्टेंबर राशिभविष्य (Libra September Horoscope 2025)
सर्जनशीलता आणि कलात्मकता यांना पूरक पोषक असलेला असा हा महिना असेल. बुद्धिमत्तेच्या जोरावर विद्यार्थी वर्ग मोठा पल्ला गाठेल. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि मित्रांची मदत मिळेल. पितृपक्षात पूर्वजांप्रती कृतज्ञता व्यक्त कराल. नोकरी व्यवसायात गरजूंना आपल्या पायावर उभे कराल. विवाहोत्सुकांना गुरुबल उत्तम आहे. प्रयत्नांना यश येईल. नवरात्रात शुभ वार्ता समजेल. परदेशातील कामे मार्गी लागतील. खर्चाचे प्रमाण वाढेल. जोडीदाराच्या कार्यक्षेत्रात त्याची विशेष प्रगती होईल. संतान प्राप्तीसाठी ग्रहमान अनुकूल आहे. वैद्यकीय उपचारांना यश मिळेल. कोर्टात आपल्या बाजूने निकाल लागेल. गुंतवणुकीचा योग्य परतावा मिळाल्याने हुरूप वाढेल. यकृताच्या समस्या, त्वचा विकार यांकडे दुर्लक्ष करू नका.
कन्या सप्टेंबर राशिभविष्य (Virgo September Horoscope 2025)
परदेशातील कामे, उच्च शिक्षण या संबंधातील बातमी मिळेल. शुभ वार्ता देणारा असा हा महिना असेल. पितृपक्षात नोकरी-व्यवसायात प्रगतीकारक गोष्टी घडतील. पूर्वजांचे श्रद्धेने केलेले स्मरण लाभकारक ठरेल. विद्यार्थी वर्गाला परीक्षेत उत्तम यश मिळेल. विवाहित मंडळींना कौटुंबिक जबाबदाऱ्यांमधून दाम्पत्यसुखासाठी निवांत वेळ मिळेल. घर, जमीन यांची कामे मार्गस्थ होतील. वकील, न्यायालयाच्या फेऱ्या उपयोगी पडतील. नवरात्रात गुंतवणूकदारांनी नियोजनपूर्वक केलेली गुंतवणूक खूप लाभकारक ठरेल. पोटरीतील शिरा ताठर होऊन, वेदना वाढतील. मान आखडेल. प्रदूषणामुळे डोळे लाल होणे आणि श्वसनाचा त्रास होणे या गोष्टी संभवतात.
सिंह सप्टेंबर राशिभविष्य (Leo September Horoscope 2025)
विश्वास, श्रद्धा आणि भक्तिभाव यांनी भरलेला असा हा महिना असेल. आपल्या कर्तृत्वावर विश्वास ठेवाल. पितृपक्षात आपल्या पूर्वजांप्रती श्रद्धा व्यक्त कराल तर नवरात्रात भक्तिभाव जागृत होईल. विद्यार्थी वर्ग परीक्षेसाठी उत्तम तयारी करेल. गुरुबल चांगले असल्याने मेहनतीचे फळ मिळेल. नोकरी व्यवसायात आपले शब्द प्रमाण मानले जातील. आत्मविश्वासपूर्वक आश्वासन द्याल. स्वतःबरोबर इतरांनादेखील पुढे नेण्याचा आपला प्रयत्न यशस्वी ठरेल. विवाहोत्सुकांच्या विवाहाची बोलणी सुरू होतील. घरात उत्साहाचे वातावरण असेल. विवाहित जोडप्यांनी आपापला अहंकार दूर ठेवावा. जोडीदाराच्या मताची, भावनांची कदर कराल. वाहन खरेदी योग आहे. घराचे व्यवहार पुढे सरकतील. शेवटच्या आठवड्यात गुंतवणूकदारांना उत्तम संधी मिळेल. पित्त विकार त्रास देईल.
१२ महिन्यानंतर अखेर 'या' ३ राशींची तिजोरी पैशाने भरणार! मालव्य राजयोगामुळे अचानक धनलाभ अन् मोठं यश
कर्क सप्टेंबर राशिभविष्य (Cancer September Horoscope 2025)
मरगळ झटकून आगेकूच करणारा असा हा महिना समाधान देणारा असेल. योग्य वेळी घेतलेले योग्य निर्णय लाभदायक ठरतील. विद्यार्थिवर्गाने घेतलेल्या मेहनतीचे चीज होईल. हिंमत आणि आत्मविश्वास वाढल्याने उमेद निर्माण होईल. नोकरी व्यवसायात बदलाचा स्वीकार करण्याची तयारी दाखवाल. ही गोष्ट आपल्यासाठी उत्कर्षकारक ठरेल. गुरुबल कमजोर असल्याने विवाहोत्सुकांना वाट बघावी लागेल. विवाहित दाम्पत्यांसाठी पितृपक्षात केलेले दान वा समाजकार्य वरदान ठरेल. घर, जमीन, वाहन यांचे व्यवहार जपून करावेत. नवरात्रीचा कालावधी आनंदात जाईल. नवचैतन्य फुलेल. प्रदूषणामुळे सर्दी-खोकल्याचे प्रमाण वाढेल.
३० वर्षानंतर अखेर 'या' ३ राशींचे अच्छे दिन सुरू! शनीच्या मार्गी अवस्थेमुळे मिळेल भरपूर पैसा अन् आयुष्यातील अडचणी होतील दूर
मिथुन सप्टेंबर राशिभविष्य (Gemini September Horoscope 2025)
महिन्याची सुरुवात आनंदात होईल. मनाला समाधान देणाऱ्या गोष्टी घडतील. विद्यार्थी वर्गाला आपल्यातील कला, गुण सादर करण्याची संधी मिळेल. अभ्यास बाजूला न ठेवता तुमच्या आवडत्या विषयांसाठीदेखील वेळ काढाल. नोकरी व्यवसायात होतकरू मंडळींना मदतीचा हात द्याल. त्यांना योग्य मार्गदर्शन कराल. पितृपक्षात पूर्वजांच्या स्मरणार्थ दानधर्म कराल. तसेच सामाजिक संस्थेमध्ये बौद्धिक व वैचारिक योगदान द्याल. विवाहोत्सुक मंडळींचे ओळखीतून विवाह जमण्याची शक्यता आहे. प्रयत्न सुरू ठेवा. विवाहितांचे संतान प्राप्तीसाठीचे प्रयत्न यशस्वी होतील. घर, जमीन, शेत, वाहन यांच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारांना चालना मिळेल. नवरात्रात या कामांना गती येईल. गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगावी. उष्णता व मूत्रविकाराच्या तक्रारी वाढतील.
वृषभ सप्टेंबर राशिभविष्य (Taurus September Horoscope 2025)
हिंमत आणि उत्साह वाढवणारा हा महिना आहे. शनी तुमच्या कष्टाला योग्य न्याय देईल. त्यामुळे उशीर झाला तरी सत्याचाच विजय होईल. विद्यार्थी वर्गाला परदेशी शिक्षणाची संधी उपलब्ध होईल. रेंगाळलेल्या कामांमागे तगादा लावल्याने ती पूर्णत्वास जातील. नोकरी व्यवसायातही अशाच अनुभवाची भर पडेल. पितृपक्षात पूर्वजांच्या पुण्याईने स्मरण अतिशय लाभकारक ठरेल. गरजूंना मदत कराल. विवाहोत्सुकांनी जोडीदाराच्या संशोधनाचे प्रयत्न सुरु ठेवावेत. नवरात्रीच्या दरम्यान विवाहितांना एकमेकांची उत्तम साथ मिळेल, कामाचा हुरूप वाढेल. गुंतवणूकदारांनी थोडी विश्रांती घ्यावी. उत्सर्जन संस्थेचे विकार त्रासदायक ठरतील.
मेष सप्टेंबर राशिभविष्य (Aries September Horoscope 2025)
आपल्या हातून जी कर्म घडतात त्याचे फळ तुम्हाला मिळणार. पूर्वजांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या या पितृपक्षात तुमच्या हातून सत्कर्म घडतील. काही जण दानधर्म करतील. विद्यार्थ्यांचा हा कसोटीचा कालावधी असेल; त्यामुळे अभ्यासावर लक्ष केंद्रित केलेत तरच निभावून घ्याल. नोकरी व्यवसायात नव्या योजनांमध्ये सहभागी व्हाल, नव्या लोकांच्या ओळखी होतील. त्याचबरोबर जोडीदाराचा सहवास आनंददायी ठरेल. संतानप्राप्तीचे योग आहेत. कामाच्या व्यापात तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. गुंतवणूकदारांना सुवर्णसंधी मिळणार आहे; त्यामुळे त्यांनी अभ्यासपूर्वक गुंतवणूक करवी. नवरात्रीचा कालावधी तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या लाभकारक ठरेल.
शुक्र प्रदोष व्रताच्या दिवशी कोणत्या राशीच्या अडचणी होणार दूर? घरात आनंदी वातावरणासह कामातही मिळेल यश; वाचा राशिभविष्य
मेष ते मीनपैकी, पितृपक्षात कोणाचं नशीब उजळणार? नवरात्रीत कोणावर कृपा करणार माता लक्ष्मी; वाचा सप्टेंबरचं १२ राशींचं भविष्य
<strong>आजचे राशिभविष्य लाईव्ह ५ सप्टेंबर २०२५ : Daily horoscope live updates in Marathi</strong>