Rahu Nakshatra Gochar: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे ठराविक काळानंतर राशी परिवर्तन होते. ग्रह राशींव्यतिरिक्त वेळोवेळी नक्षत्र परिवर्तनही करतात; ज्याचा प्रभाव १२ राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. ६ मे रोजी राहू ग्रहाने रेवती नक्षत्रामध्ये प्रवेश केला आहे; ज्याचा प्रभाव सर्व राशींच्या लोकांवर पाहायला मिळेल. परंतु, यात काही खास राशी अशा आहेत; ज्यांच्यासाठी राहूचे नक्षत्र परिवर्तन अधिक लाभदायी सिद्ध होणार आहे.

मेष

राहू ग्रहाचे नक्षत्र परिवर्तन मेष राशीच्या व्यक्तींसाठी खूप फायदेशीर ठरेल. या काळात तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल. वाहन, प्रॉपर्टी खरेदी कराल. या काळात भौतिक सुखांची प्राप्ती होईल. आत्मविश्वास वाढेल, समाजात मान-सन्मान वाढेल. तुम्ही आलेल्या प्रत्येक संकटावर मात कराल. वैवाहिक जीवन सुखमय असेल. त्यामुळे जीवनसाथीची साथ प्रत्येक कामात मिळेल. नोकरी-व्यापार करणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल असेल. या काळात आर्थिक चणचण दूर होईल; तसेच वायफळ खर्च थांबतील. मुलांसोबत सहलीला जाल.

वृषभ

वृषभ राशीच्या लोकांसाठीही राहूचे नक्षत्र परिवर्तन खूप शुभ परिणाम देणारे ठरेल. या काळात तुमच्या उत्पन्नात वाढ होईल. आकस्मिक धनलाभ होतील. गुंतवणुकीचा फायदा होईल. यावेळी तुमचे व्यक्तिमत्त्व सुधारेल. कामाच्या ठिकाणी दिले गेलेले लक्ष्य पूर्ण कराल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील. या काळात भाग्य तुमच्या बाजूने असेल. शत्रू तुमच्या वाटेला जाणार नाहीत.

हेही वाचा: शनी देणार बक्कळ पैसा! नक्षत्र परिवर्तनाचा ‘या’ तीन राशींना होणार मोठा फायदा

मकर

राहू ग्रहाचे नक्षत्र परिवर्तन मकर राशीच्या व्यक्तींसाठी खूप फायदेशीर ठरेल. या काळात तुम्हाला करिअर, व्यवसाय, स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. आकस्मिक धनलाभ होईल. मान-सन्मान वाढेल. सर्वांसोबत चांगले संबंध निर्माण होतील आणि जुने वाद मिटतील. दूरचे प्रवास घडतील. प्रत्येक कामात कुटुंबीयांची साथ मिळेल. तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. तीर्थक्षेत्रांना भेटी द्याल. व्यवसायात अधिक वाढ होईल.