November Born Boys And Girls Name : प्रत्येकाला आपल्या मुलासाठी किंवा मुलीसाठी एक वेगळे आणि सुंदर नाव ठेवायचे असते, ज्याचा सुंदर अर्थदेखील असतो. जर तुमचा मुलगा किंवा मुलगी नोव्हेंबरमध्ये जन्माला येणार असेल, तर तुम्ही तुमच्या मुला-मुलींसाठी एक सुंदर, ट्रेंडी व धार्मिक नाव निवडले पाहिजे. कारण- नावाचा प्रभाव आयुष्यभर टिकून राहतो. म्हणून नाव निवडण्याची घाई करू नका. कारण- नोव्हेंबरमध्ये जन्माला येणाऱ्या मुलांसाठी जबरदस्त नावांची यादी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

नोव्हेंबरमध्ये जन्मणाऱ्या मुलींची नावे

  • अमलेश – अमलेश म्हणजे शुद्ध.
  • अमिष– या नावाचा अर्थ प्रामाणिक असा होतो.
  • कार्तिक – जर तुम्हाला तुमच्या मुलासाठी नोव्हेंबर महिन्याशी संबंधित नाव हवे असेल, तर तुम्ही कार्तिक निवडू शकता; जे भगवान शंकराच्या मुलाचे नाव आहे.
  • आरव – या सुंदर नावाचा अर्थ शांत किंवा गोड आवाज, असा होतो.
  • निमेश– निमेश नावाचा अर्थ डोळा मिचकावण्याइतका थोडा वेळ आणि डोळ्यांची चमक (तेज) असा होतो.

नोव्हेंबरमध्ये जन्मणाऱ्या मुलींची नावे

  • अन्या – अन्या या नावाचा अर्थ दयाळू असा होतो. तसेच अन्या देवी दुर्गेचे एक रूप सुद्धा आहे.
  • कियारा – नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या मुलीसाठी तुम्ही कियारा हे नाव निवडू शकता, ज्याचा अर्थ तेजस्वी, असा होतो.
  • दिव्यांका – तेजस्वी व्यक्तिमत्त्व, पवित्रता, तेज व सौंदर्य, असा या नावाचा अर्थ होतो.
  • अद्विका – अद्विकाचा अर्थ अद्वितीय किंवा अतुलनीय असा आहे.
  • तनिष्का – देवी लक्ष्मीच्या अनेक नावांपैकी एक, तनिष्का हे नाव निवडू शकता, ज्याचा अर्थ सोन्यासारखा चमकणारा असा आहे.