Janmashtami 2025 Shubh Yog: हिंदू धर्मात श्रीकृष्ण जन्माष्टमी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव १६ ऑगस्टला साजरा केला जाईल. धार्मिक दृष्टिकोनातून तसेच ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातूनही जन्माष्टमीचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. या दिवशी ५ ग्रह खास स्थितीत असतील आणि ३ राशींचे भाग्य उजळवतील.

जन्माष्टमीला बुध मार्गी राहतील आणि कर्क राशीत सूर्याबरोबर युती करतील. शनी वक्री आहेत आणि गुरु व शुक्र मीन राशीत मिळून अतिशय शुभ योग तयार करतील. याशिवाय भरणी, कृत्तिका आणि रोहिणी नक्षत्रांचा संयोगही असेल. तसेच १६ ऑगस्ट २०२५ रोजी वृद्धी योग, सर्वार्थसिद्धी योग, अमृतसिद्धी योग आणि ज्वालामुखी योग असा महासंयोग होत आहे. चला तर मग यानिमित्ताने जाणून घ्या हा महासंयोग कोणत्या ३ राशींना मोठा फायदा देईल.

वृषभ राशी (Taurus Horoscope)

वृषभ राशीच्या लोकांसाठी जन्माष्टमीला होत असलेले शुभ योग खूप फायदेशीर ठरतील. तुमची सगळी अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल. मोठे यश मिळू शकते. लग्न ठरण्याची शक्यता आहे. अनपेक्षित धनलाभ होऊ शकतो.

मिथुन राशी (Gemini Horoscope)

मिथुन राशीच्या लोकांना गुरु आणि शुक्राची युती मोठा फायदा देईल. करिअरमध्ये तुम्हाला मोठे यश मिळू शकते. कोणाशी चांगली भागीदारी होऊ शकते. व्यावसायिक लोक भरपूर पैसा कमावतील.

सिंह राशी (Leo Horoscope)

सिंह राशीच्या लोकांना जन्माष्टमीचे शुभ योग अचानक धनलाभ देतील. या काळात केलेली कामे चांगले फळ देतील. ऑफिसमधील तुमची स्थिती सुधारेल. व्यवसायात फायदा होईल. प्रेमसंबंध चांगले राहतील. अपत्यप्राप्तीची शक्यता आहे.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)