Horoscope Today In Marathi 3 november 2025 : आज ३ नोव्हेंबर २०२५ रोजी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी असणार आहे. आज हर्षल योग जुळून येईल आणि उत्तर भाद्रपद नक्षत्र जागृत असणार आहे. राहू काळ ४ वाजून १२ मिनिटांनी सुरु होईल ते ५ वाजून ३२ मिनिटांपर्यंत असणार आहे. अभिजित मुहूर्त ११ वाजून ३९ मिनिटांनी सुरु होईल ते १२ वाजून २२ मिनिटांपर्यंत असणार आहे. आज कार्तिक महिन्यातील सोम प्रदोष व्रत असणार आहे. सोमवारी प्रदोष व्रत येणे अत्यंत शुभ मानले गेले आहे. महादेव शिवशंकरांना समर्पित असलेले प्रदोष व्रत अत्यंत महत्वाचे असतात. तर शंकराच्या आशीर्वादाने तुमचा दिवस कसा जाईल जाणून घेऊयात…

आजचे पंचांग व राशिभविष्य, ३ नोव्हेंबर २०२५ (Today Horoscope 3 November 2025 In Marathi)

दैनिक मेष राशिभविष्य (Aries Daily Horoscope Today In Marathi)

आपल्या हातून चांगले काम घडेल. मानसिक अस्वस्थता जाणवू देऊ नका. नोकरदार वर्गाला दिलासादायक परिस्थिति आहे. काही प्रसंगामूळे चिडचिड होऊ शकते. दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल.

दैनिक वृषभ राशिभविष्य (Taurus Daily Horoscope Today In Marathi)

कलाक्षेत्रातील लोकांना प्रसिद्धी मिळेल. आपल्या कामाची योग्य दखल घेतली जाईल. वातावरण आनंदी व उत्साही राहील. ज्येष्ठ मंडळींकडून धनलाभाची शक्यता. संगीताचा, कलेचा आनंद घेऊ शकता.

दैनिक मिथुन राशिभविष्य (Gemini Daily Horoscope Today In Marathi)

घरात वेगवेगळी कामे निघतील. जोडीदाराची अनपेक्षितरित्या मदत होईल. नोकरीत सुस्थता लाभेल. घरासाठी नवीन वस्तु खरेदी कराल. हास्य-विनोदात दिवस जाईल.

दैनिक कर्क राशिभविष्य (Cancer Daily Horoscope Today In Marathi)

शोधत असलेले काम पूर्ण होईल. मुलांकडून शुभ वार्ता मिळतील. भेटवस्तू मिळण्याचे संकेत. मित्रांमुळे निराशा समाप्त होईल. एखादे चांगले साहित्य वाचनात येईल.

दैनिक सिंह राशिभविष्य (Leo Daily Horoscope Today In Marathi)

बोलण्यात अत्यंत मधुरता ठेवाल. सर्वांची मने जिंकून घ्याल. मानसिक शांतता लाभेल. मनोबल वाढीस लागेल. आहारावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे.

दैनिक कन्या राशिभविष्य (Virgo Daily Horoscope Today In Marathi)

आपल्या कर्तुत्वाने कार्य सिद्धीस न्याल. मुद्दा मांडताना गाफिल राहू नका. व्यापारी वर्गाला चांगला लाभ संभवतो. मिळकतीत वाढ संभवते. काही जुने मतभेद मिटू शकतील.

दैनिक तूळ राशिभविष्य (Libra Daily Horoscope Today In Marathi)

बरेच दिवस राहून गेलेला प्रवास कराल. एखादे कार्य मनाविरुद्ध करावे लागू शकते. कामाची दगदग राहील. थोडावेळ स्वत:साठी देखील काढावा. अचानक खर्चात वाढ होऊ शकते.

दैनिक वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Daily Horoscope Today In Marathi)

गोष्टी मनाप्रमाणे घडतील. जुनी उधारी वसूल होईल. पालकांचे सान्निध्य व आशीर्वाद लाभेल. जुनी कामे पूर्णत्वास जातील. तज्ञ व्यक्तींचे सहकार्य मिळेल.

दैनिक धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope Today In Marathi)

दूरच्या नातेवाईकांशी गप्पा माराल. व्यावसायात मोठी हालचाल दिसून येईल. कामातील काही अडचणी दूर कराव्या लागतील. बोलताना तारतम्य बाळगा. कुटुंबातील सदस्यांशी वैचारिक मतभेद संभवतात.

दैनिक मकर राशिभविष्य (Capricorn Daily Horoscope Today In Marathi)

आपल्या कामाची योग्य दखल घेतली जाईल. घरात अनावश्यक खर्च निघेल. प्रवासात काळजी घ्यावी. विरोधक नामोहरम होतील. दानधर्म कराल.

दैनिक कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope Today In Marathi)

आलेल्या संधीचा लाभ उठवा. मित्रांमध्ये चांगल्या चर्चेत राहाल. धार्मिक कार्यात रुची वाढेल. रागावर नियंत्रण ठेवावे. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल.

दैनिक मीन राशिभविष्य (Pisces Daily Horoscope Today In Marathi)

नोकरीमध्ये मोठ्या लोकांकडून स्तुती केली जाईल. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. धर्म-कार्यात आस्था वाढेल. डागडुजीवर खर्च होऊ शकतो. जवळच्या मित्रांशी भेट शक्य.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर