वैदिक ज्योतिषशास्त्रानुसा, प्रत्येक ग्रह ठराविक कालावधीनंतर आपली राशी बदलतो. या राशी बदलाचा परिणाम मानवी जीवनावर होतो. तसेच हा बदल काहींसाठी शुभ तर काहींसाठी अशुभ ठरतो. १२ एप्रिल २०२२ रोजी छाया ग्रह केतूने तूळ राशीत प्रवेश केला आहे. हा ग्रह तूळ राशीत दीड वर्षे म्हणजेच २०२३ पर्यंत राहणार आहे. त्यामुळे केतूच्या या बदलाचा प्रभाव सर्व राशींवर राहील. परंतु अशा तीन राशी आहेत त्यांना फायदा होऊ शकतो.

मकर : केतू ग्रहाचे संक्रमण तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कारण केतू ग्रह तुमच्या अकराव्या भावात भ्रमण करत आहे. या स्थानाला उत्पन्नाचे स्थान म्हणतात. अनेक नवीन स्त्रोतांकडून पैसे मिळवू शकता. यासोबतच व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो. तुम्हाला अचानक आर्थिक लाभ देखील मिळू शकतो. व्यवसायात नवीन करार पूर्ण करू शकता. नोकरीत पदोन्नतीची शक्यता आहे. तसेच अडकलेले पैसे मिळू शकतात. एकंदरीत केतूचे संक्रमण तुमच्यासाठी शुभ राहणार आहे.

कर्क: केतू ग्रह तुमच्या राशीत चौथ्या भावात भ्रमण करत आहे. या स्थानाला सुखाचे घर म्हटले जाते, त्यामुळे केतू ग्रहाची ही स्थिती कर्क राशीच्या लोकांसाठी उत्साहवर्धक ठरू शकते. विविध भाषा शिकण्यात रस आहे किंवा अनुवादक म्हणून करिअर करू इच्छितात त्यांच्यासाठीही हा काळ खूप चांगला आहे. यावेळी तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. तुम्हाला मालमत्ता आणि वाहनाचे सुख देखील मिळेल. यासोबतच तुम्हाला यावेळी आईची पूर्ण साथ मिळेल.

Shukra Gochar: मीन राशीत शुक्र ग्रह करणार गोचर, या राशींना मिळणार पाठबळ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कुंभ: केतू ग्रह तुमच्या संक्रमण कुंडलीतून नवव्या भावात प्रवेश करत आहे. हे स्थान भाग्य आणि परदेश प्रवासाचे स्थान असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे यावेळी तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. तसेच जे काम हाती घेतलं असेल त्यात यश मिळेल. तुम्ही व्यावसायिक कामानिमित्त बाहेर कुठेतरी प्रवास करू शकता, जे भविष्यात तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या काळात यश मिळू शकते. ज्यांची वेतनवाढ थांबली होती, त्यांना यावेळी पदोन्नती आणि वेतनवाढ मिळू शकते.