Mulank 7 people : अंकशास्त्रानुसार, प्रत्येक मूलांकचा ग्रह स्वामी असतात. केतु ग्रह मूलांक ७ चे स्वामी आहे. मूलांक ७ च्या लोकांवर केतु ग्रहाचा प्रभाव असतो.
क्रूर आणि पापी ग्रह केतुची कृपा व्यक्तीला गरीबापासून श्रीमंत बनवते. केतू ग्रहाला एक खास मूलांक खूप जास्त प्रिय आहे आणि त्या मूलांकच्या लोकांचे अचानक नशीब चमकू शकते. तो मूलांक कोणता जाणून घ्या.

मूलांक ७

कोणत्याही महिन्याच्या ७, १६,आणि २५ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ७ असतो. केतु ग्रहाला या तारखेला जन्मलेले लोक अतिशय प्रिय असतात. त्यांच्यावर केतु ग्रहाची विशेष कृपा असते. हे लोक केतु ग्रहाच्या कृपेने आयुष्यात खूप पुढे जातात. त्यांना आयुष्यात भरपूर यश, पैसा अन् धन संपत्ती मिळते.

बुद्धिमानी व रहस्यमयी स्वभावाचे असतात

मूलांक ७ असलेले लोक अतिशय शांत, बुद्धिमानी, जिज्ञासू आणि रहस्यमयी स्वभावाचे असतात. ते आपल्या बौद्धिक क्षमतेने आयुष्यात खूप यश मिळवतात. ते बुद्धिमत्तेच्या जोरावर आयुष्यात खूप प्रगती करतात. या लोकांना अध्यात्माची खूप जास्त आवड असते. ते नेहमी नवीन गोष्टी जाणून घेण्याचा व शिकण्याचा प्रयत्न करतात. त्यांना आयुष्यात हटके काहीतरी आवडते. ते आपल्या वैयक्तिक आयुष्याविषयी उघडपणे कोणालाही सांगत नाही. ते फार कमी बोलतात. ते आपल्या विचार आणि सिद्धांतबद्दल ठाम असतात.

धाडसी व क्रिएटिव्ह

मूलांक ७ असलेले लोक अत्यंत धाडसी व क्रिएटिव्ह स्वभावाचे असतात. ते कधीही आव्हानाचा सामना करण्यास घाबरत नाही. आत्मविश्वासामुळे ते आयुष्यात खूप पुढे जातात. तसेच ते नवनवीन गोष्टींमध्ये क्रिएटिव्हीटी दाखवतात. तसेच आपल्या स्वाभिमानाने मोठे यश मिळवतात. अनेक वर्षानंतरच्या मेहनतीनंतर त्यांना आयुष्यात अपार यश मिळते.

आपल्या मनाचे मालक असतात

मूलांक ७ असलेल्या लोकांना आपल्या अटीवर जगायला आवडते. ते इतरांचे ऐकतात पण शेवटी त्यांना जे पटते, तेच करतात. ते आपल्या मनाचे मालक असतात. त्यांनी जर एखादी गोष्ट ठरवली तर ते पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. जर ते निराश झाले तर त्यांना पुन्हा ट्रॅकवर आणणे थोडे कठीण असते. त्यांना एकटे राहायला खूप जास्त आवडते.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)