Ketu Gochar in December: वर्षाच्या शेवटच्या महिन्यात म्हणजे डिसेंबरमध्ये केतु पूर्वाफाल्गुनी नक्षत्राच्या दुसऱ्या चरणात प्रवेश करेल. या गोचरामुळे काही राशींच्या लोकांना खास फायदा होईल. चला तर मग पाहूया, त्या भाग्यवान राशी कोणत्या आहेत आणि त्यांना नेमका काय लाभ मिळणार आहे.
केतुचा पूर्वाफाल्गुनी नक्षत्राच्या दुसऱ्या पादात गोचर
२ डिसेंबर २०२५ रोजी मंगळवारी रात्री २:११ वाजता केतु पूर्वाफाल्गुनी नक्षत्राच्या दुसऱ्या चरणात प्रवेश करेल. शुक्राच्या अधिपत्याखालील या नक्षत्रात प्रवेश केल्यामुळे सर्व १२ राशींवर परिणाम होईल.
वैदिक ज्योतिषानुसार अध्यात्म, वैराग्य आणि सर्जनशीलतेचा कारक ग्रह म्हणजे छाया ग्रह केतु. तो पूर्वाफाल्गुनी नक्षत्राच्या दुसऱ्या चरणात प्रवेश करत असल्याने ३ राशींच्या लोकांवर खास परिणाम होऊ शकतो. त्यांना अनेक फायदे मिळू शकतात.
मेष राशी (Aries Horoscope)
केतूचं हे गोचर मेष राशीच्या लोकांसाठी खूप शुभ ठरणार आहे. त्यांची सर्जनशीलता वाढेल. प्रेमसंबंधात सुधारणा होईल आणि जे अविवाहित आहेत त्यांना लवकरच जोडीदार मिळेल. जे लोक शिक्षण घेत आहेत त्यांची एकाग्रता वाढेल. नवीन योजना किंवा नवीन कल्पनांवर काम करण्याची संधी मिळेल. अध्यात्मिकदृष्ट्या प्रगती होईल. तसेच धन मिळवण्याचे उद्दिष्टही पूर्ण करता येईल.
सिंह राशी (Leo Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी केतूचं हे गोचर खूप शुभ ठरेल. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात आकर्षण वाढेल आणि नेतृत्व क्षमता सुधारेल. ते अध्यात्मिकदृष्ट्या अधिक सक्रिय राहतील. कामाच्या ठिकाणी काम करण्याची ताकद वाढेल. केलेल्या कामाचे उत्तम परिणाम मिळतील आणि धनवाढीचे मार्गही उघडतील. भावनिकदृष्ट्या ते मजबूत होतील, पण जास्त विचार केल्याने मनात अस्वस्थता वाढू शकते.
मकर राशी (Capricorn Horoscope)
मकर राशीच्या लोकांसाठी केतूचा हा गोचर उत्पन्न वाढवणारा ठरू शकतो. अडकलेले पैसे मिळू शकतात आणि धन कमावण्याचे नवे मार्ग उघडू शकतात. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांकडून मदत मिळेल. एखाद्या नात्याबद्दल किंवा वस्तूबद्दल दूरत्व वाढू शकते. स्वतःला सिद्ध करण्याची मोठी संधी किंवा जबाबदारी मिळू शकते. जुनी उद्दिष्टे पूर्ण करण्यात ते यशस्वी ठरतील.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)