Kiara Advani Baby girl Numerology Predictions: बॉलीवडचं लोकप्रिय कपल कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राच्या घरी चिमुकलीचं आगमन झालं. कालच म्हणजे १५ जुलै २०२५ रोजी कियारानं गोंडस मुलीला जन्म दिला. त्याबद्दल सोशल मीडियावर पोस्ट शेअर करीत दोघांनी ही गुड न्यूज चाहत्यांना दिली आहे.

लेकीच्या आगमनानं कियारा अडवाणी सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या घरी आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यांचं कुटुंब आणि चाहत्यांकडून त्यांना शुभेच्छा मिळत आहेत.

सगळ्यांनाच उत्सुकता आहे की, हे बॉलीवूड कपल आपल्या मुलीचं नाव काय ठेवणार आहे. यादरम्यान, आता अंकशास्त्राच्या मदतीनं आपण पाहूया की, १५ जुलैला जन्मलेल्या मुलींचं व्यक्तिमत्त्व कसं असतं?

१५ तारखेला जन्मलेल्या मुली कशा असतात? (Mulank 6 Numerology Predictions)

कियारा अडवाणीच्या मुलीचा जन्म १५ जुलैला झाला आहे. अंकज्योतिषानुसार तिचा मूलांक ६ असा येतो. अंक ६ हा भौतिक सुख-सुविधांचा कारक असलेल्या शुक्र ग्रहाचा प्रतीक आहे.

१. ज्यांचा जन्म कुठल्याही महिन्याच्या ६, १५ किंवा २४ तारखेला होतो, त्यांचा मूलांक ६ असतो. अंक ६ ला भौतिक सुख, आकर्षण, प्रेम, सौंदर्य, संगीत इत्यादींचं प्रतीक मानलं जातं.

२. मूलांक ६ असलेल्या मुली सुंदर, मनानं नाजूक आणि नात्यांमध्ये प्रामाणिक असतात. त्यांना सुंदर दिसणं, छान कपडे घालणं, सजणं-नटणं खूप आवडतं. कारण- त्यांच्यावर शुक्र ग्रहाचा प्रभाव असतो.

३. मूलांक ६ असलेल्या लोकांना गाणं, संगीत, अभिनय, फॅशन, नृत्य, डिझायनिंग यांसारख्या क्षेत्रांमध्ये खूप रस असतो.

४. मूलांक ६ असलेल्या मुलींचं कुटुंब आणि समाजासाठी मोठं योगदान असतं. त्या जिथेही असतात तिथे सुख, शांती व समतोल राखतात.

५. मूलांक ६ असलेले लोक मध्यस्थ आणि सल्लागाराची भूमिकादेखील खूप चांगल्या प्रकारे पार पाडतात. कारण- शुक्र हा असुरांचा गुरू होता आणि तो त्यांना सल्ला द्यायचा.

६. मूलांक ६ असलेले लोक खूप मेहनती असतात. त्यांना सुख, सौंदर्य व ऐश्वर्य यांची आवड असते. त्यांना प्रवास करायला आणि शानदार जीवनशैली जगायला खूप आवडतं.

७.मूलांक ६ असलेले लोक त्यांच्या प्रेमी जीवनात जोडीदाराकडून जास्त अपेक्षा ठेवतात. ते आपल्या जोडीदारावर खूप प्रेम करतात.

८. हे लोक इतरांची खूप काळजी घेतात, अनेक वेळा ते स्वतःकडे दुर्लक्ष करतात. त्यांची ही एक कमजोर बाजू आहे. ते लवकर भावूक होतात.

९. मूलांक ६ असलेल्या लोकांच्या मनात कधी कधी निर्णय घेताना संभ्रम निर्माण होतो.

१०. मूलांक ६ असलेले लोक हॉटेल व्यवसाय, पर्यटन, दागिने, कॉस्मेटिक्स, फॅशन, इंटेरियर डिझायनिंग, परफॉर्मिंग आर्टस्, काउन्सिलिंग, सोशल वर्क, इव्हेंट मॅनेजमेंट, डिप्लोमसी, ब्रँडिंग व रिलेशनशिप मॅनेजमेंट अशा क्षेत्रांमध्ये जास्त यशस्वी होतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती अंकशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)