Kojagiri Purnima 2025 Horoscope: हिंदू धर्मामध्ये प्रत्येक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेचे खास महत्व आहे. अश्विन महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा असे म्हंटले जाते. कोजागिरी पौर्णिमेला चंद्र पृथ्वीच्या अत्यंत जवळ असल्याने त्याची प्रकाश किरणं समस्त जीवसृष्टीकरता लाभदायक असल्याचे मानले जाते. तर कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र आपल्या संपूर्ण १६ कलांमध्ये असतो. दरम्यान, ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातूनही हा दिवस खूप लाभदायी मानला जाईल. पंचांगानुसार, पौर्णिमेच्या दिवशी दुपारी १२ वाजून ४४ मिनिटांनी चंद्र शनीच्या कुंभ राशीत प्रवेश करेल. ज्याचा शुभ प्रभाव १२ पैकी काही राशींच्या व्यक्तींना पाहायला मिळेल.

‘या’ तीन राशींना कोजागिरीचा दिवस जाणार लाभदायी

मेष (Mesh Rashi)

मेष राशीच्या व्यक्तींसाठी कोजागिरीला होणारे चंद्राचे गोचर खूप अनुकूल सिद्ध होईल. रखडलेली कामे लवकर पूर्ण होतील. देवी लक्ष्मीच्या आशीर्वादामुळे तुम्हाला संपत्ती मिळेल.ऑफिसमध्ये तुम्हाला मोठी जबाबदारी मिळू शकते. तुमच्यावर काही कर्ज असेल तर तेही फेडता येईल.

तूळ (Tula Rashi)

तूळ राशीच्या लोकांसाठी या दिवशी नवीन वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याची शक्यता आहे. बँक बॅलन्स वाढतच राहील. मित्र आणि नातेवाईकांकडून काही चांगली बातमी मिळू शकते. व्यवसायात तुम्हाला मोठा फायदा होऊ शकतो. कुटुंब आणि समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल.

सिंह (Singh Rashi)

सिंह राशीच्या व्यक्तींना कोजागिरीचा दिवस खूप शुभ असेल. कुठेतरी अडकलेला पैसा परत मिळू शकेल. जुन्या गुंतवणुकेतून तुम्हाला फायदा होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाची प्रशंसा होईल. नवीन काम सुरू करण्यासाठीही वेळ उत्तम आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. मुलाच्या प्रगतीने मन प्रसन्न राहील. व्यवसायात तुम्हाला मोठा फायदा होऊ शकतो. कुटुंब आणि समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)