Kojagiri Purnima 2025 Importance: हिंदू धर्मामध्ये प्रत्येक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेचे खास महत्व आहे. धार्मिक आणि आरोग्याच्या दृष्टीने या पौर्णिमेला अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते. कोजागरी पौर्णिमेला चंद्र पृथ्वीच्या अत्यंत जवळ असल्याने त्याची प्रकाश किरणं समस्त जीवसृष्टीकरता लाभदायक असल्याचे मानले जाते. तर कोजागरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र आपल्या संपूर्ण १६ कलांमध्ये असतो. त्यामुळे यादिवशी चंद्रासह देवी लक्ष्मीची पूजा-आराधना करणं अत्यंत खास मानले जाते. असं म्हणतात या दिवशी मध्यरात्रीपर्यंत जागरण करून देवी लक्ष्मीच्या मंत्र-स्तोत्रांचे पठण केल्याने देवीची विशेष कृपा प्राप्त होते.

कोजागिरी पूजेचा शुभ मुहूर्त

कोजागिरीच्या रात्री ११ वाजून ४५ मिनिटांपासून ते १२ वाजून ३४ मिनिटांपर्यंत लक्ष्मीचे पूजन करण्याचा शुभ मुहूर्त आहे. या शुभ मुहूर्तावर देवी नारयण आणि लक्ष्मीच्या फोटोसमोर तूपाचा दिवा लावून श्रीसुक्ताचे पठण करावे. त्यानंतर चंद्राच्या प्रकाशात ठेवलेल्या दूधाचा नैवेद्य दाखवून त्या दूधाचे सेवन करावे.

देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे ‘हे’ स्तोत्र

देवी लक्ष्मीला श्रीसुक्त अत्यंत प्रिय असून या स्तोत्राच्या पठणाने व्यक्तीला भौतिक सुख, संपन्नता आणि ऐश्वर्याची प्राप्ती होते. या स्तोत्राचे पठण करण्यासाठी केवळ १ ते २ मिनिटांचा कालावधी लागतो. या स्तोत्रामध्ये १६ ऋचा असून शेवटी फुलश्रुतीदेखील म्हटली जाते. तुम्ही या स्तोत्राचे पठण १, ३,५, ११ किंवा १६ वेळा करू शकता. कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री या स्तोत्राचे पठण केल्याने देवी लक्ष्मी अत्यंत प्रसन्न होतात.

श्रीसुक्त

  • ॐ हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्त्रजाम्।
    चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आ वह॥ (1)
  • ॐ तां म आ वह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीम् ।
    यस्यां हिरण्यं विन्देयं गामश्वं पुरुषानहम॥ (2 )
  • ॐ अश्वपूर्वां रथमध्यां हस्तिनाद्प्रमोदिनिम।
    श्रियं देविमुप हव्ये श्रीर्मा देवी जुषताम ॥ (3)
  • ॐ कां सोस्मितां हिरण्य्प्राकारामार्द्रां ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीम्।
    पद्मेस्थितां पदमवर्णां तामिहोप हवये श्रियम्॥ (4 )
  • ॐ चन्द्रां प्रभासां यशसा ज्वलन्ती श्रियं लोके देवजुष्टामुदाराम्।
    तां पद्मिनीमी शरणं प्रपधे अलक्ष्मीर्मे नश्यतां त्वां वृणे॥ (5 )
  • ॐ आदित्यवर्णे तप्सोअधि जातो वनस्पतिस्तव वृक्षोsथ बिल्वः।
    तस्य फलानि तपसा नुदन्तु या अन्तरा याष्च बाह्य अलक्ष्मीः॥ (6 )
  • उपैतु मां देवसखः कीर्तिश्च मणिना सह।
    प्रदुर्भूतोsस्मि राष्ट्रेsस्मिन कीर्तिमृद्धिं ददातु में ॥ (7 )
  • क्षुत्पिपासामलां ज्येष्ठमलक्ष्मीं नाशयाम्यहम्।
    अभूतिमसमृद्धि च सर्वां निर्णुद में गृहात्॥ (8 )
  • गन्धद्वारां दुराधर्षां नित्यापुष्टां करीषिणीम्।
    ईश्वरीं सर्वभूतानां तामिहोप हवये श्रियम्। (9 )
  • मनसः काममाकूतिं वाचः सत्यमशीमहि।
    पशुनां रूपमन्नस्य मयि श्रियं श्रयतां यशः॥ (10 )
  • कर्दमेन प्रजा भूता मयि संभव कर्दम।
    श्रियम वास्य मे कुले मातरं पद्ममालिनीम्॥ (11 )
  • आपः सृजन्तु स्निग्धानि चिक्लीत वस् मे गृहे।
    नि च देवीं मातरं श्रियं वासय मे कुले ॥ (12)
  • आर्द्रा पुष्करिणीं पुष्टिं पिंगलां पदमालिनीम्।
    चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मी जातवेदो म आ वह॥ (13)
  • आर्द्रा यः करिणीं यष्टिं सुवर्णां हेममालिनीम्।
    सूर्यां हिरण्मयीं लक्ष्मी जातवेदो म आ वह॥ (14 )
  • तां म आवह जातवेदो लक्ष्मी मनपगामिनीम् ।
    यस्यां हिरण्यं प्रभूतं गावो दास्योsश्रान विन्देयं पुरुषानहम्॥ (15 )
  • यः शुचिः प्रयतो भूत्वा जुहुयादाज्यमन्वहम्।
    सूक्तं पञ्चदशर्च च श्रीकामः सततं जपेत्॥ (16 )

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)