Krishna Favourite Zodiac Sign: हिंदू धर्मामध्ये कृष्ण जन्माष्टमीला विशेष महत्त्वपूर्ण मानले जाते. कारण या दिवशी श्री विष्णूंचा आठवा अवतार असलेल्या श्रीकृष्णाचा जन्म झाला होता, त्यामुळेच श्रावणातल्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला कृष्णाष्टमी हा सण साजरा केला जातो. यंदा २६ ऑगस्ट रोजी हा सण साजरा केला जात आहे. या दिवशी अनेक शुभ योगांची निर्मिती होणार असून अनेक वर्षांनंतर या दिवशी ग्रह-नक्षत्रांचा दुर्लभ संयोग निर्माण होत आहे. कृष्ण जन्माष्टमीचा हा दिवस श्रीकृष्णांच्या १२ राशींपैकी काही आवडत्या राशींसाठी खूप खास असेल.

‘या’ राशींवर असणार श्रीकृष्णाची कृपा (Krishna janmashtami 2024)

वृषभ

ज्योतिषशास्त्रानुसार वृषभ राशी श्रीकृष्णाच्या प्रिय राशींपैकी एक आहे. त्यामुळे या राशीच्या व्यक्तींवर श्रीकृष्णाची सदैव कृपा असते. या व्यक्तींना सदैव भौतिक सुखाची प्राप्ती होईल. धनसंपत्तीची कधीही कमतरता भासणार नाही. प्रेमसंबंध चांगले राहतील. कुटुंबातील सर्वांचे प्रेम मिळेल. तुमच्या मानसन्मानात वाढ होईल. तुमच्या भौतिक सुखात वाढ होईल.

कर्क

कर्क राशीदेखील श्रीकृष्णाची प्रिय राशी आहे. श्रीकृष्णाची पूजा-आराधना केल्याने तुमच्या आयुष्यातील अनेक अडचणींवर मात करण्यास यश मिळते. कृष्णाष्टमीचा दिवस तुम्हाला प्रत्येक कामात यश, कीर्ती मिळवून देईल. आयुष्यात आनंदी आनंद असेल. आरोग्य समस्या दूर होतील. अडकलेली कामे पूर्ण होतील. फक्त या काळात आरोग्याची काळजी घ्या.

सिंह

सिंह राशीही श्रीकृष्णाची अत्यंत प्रिय राशी आहे. श्रीकृष्णाच्या कृपेने सिंह राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात आनंदी आनंद येईल. आकस्मिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. नव्या नोकरीची ऑफर मिळण्याची शक्यता आहे. मानसन्मानात वाढ होईल. कुटुंबातही सुख-शांतीचे वातावरण राहील. त्याशिवाय तुम्ही त्यांच्यासोबत पिकनिकचा प्लानदेखील कराल.

हेही वाचा: आता नुसता पैसा; कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी गुरू, चंद्र, शनी चमकवणार ‘या’ तीन राशींचे भाग्य

तूळ

तूळ राशीदेखील श्रीकृष्णाची प्रिय राशी आहे. त्यामुळे या राशीच्या व्यक्तींसाठी श्रीकृष्णाच्या कृपेने मोठा धनलाभ होईल. या काळात सुख-सुविधांमध्ये वाढ होऊन समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. समाधानी आणि सकारात्मक असाल. कुटुंबातही आनंदाचे वातावरण असेल, त्यामुळे आयुष्यातील तणाव दूर होईल. लहान-मोठ्या अडचणींवर मात कराल. प्रेमसंबंध मजबूत होतील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)