Kuber Favourite Zodiac Signs: हिंदू धर्मात यक्षराज कुबेर यांना कोषाध्यक्ष म्हटलं जातं आणि त्यांना धनाचा देव मानलं जातं. श्रीमंत होण्यासाठी कुबेर देवाची पूजा केली जाते. आज आपण अशा ४ राशींद्दल जाणून घेणार आहोत ज्यांच्यावर कुबेर देवाची खास कृपा असते.
जसं आई लक्ष्मीला धनाची देवी मानतात, तसंच कुबेरांना धनाचे देव मानलं जातं. कुबेर देवाची कृपा झाल्यास व्यक्तीला धन – दौलत प्राप्त होते. काही राशी अशा आहेत ज्या कुबेर देवाला खूप प्रिय आहेत. या राशीच्या लोकांना वयाच्या ३५ वर्षांनंतर भरपूर पैसा आणि जमीन-संपत्ती मिळते.
वृषभ राशी (Taurus Horoscope)
वृषभ राशीचे स्वामी शुक्र आहेत, जे धन, ऐश्वर्य, सुखसोयी आणि यशाचे प्रतीक मानले जातात. या राशीच्या लोकांवर कुबेर देवाची खास कृपा असते, त्यामुळे हे लोक राजेशाही आयुष्य जगतात. त्यांना कधीच पैशाची कमी भासत नाही.
तूळ राशी (Libra Horoscope)
तूळ राशीचे स्वामी देखील शुक्र ग्रह आहेत. तूळ राशीच्या लोकांवर आई लक्ष्मी आणि कुबेर देवाची खास कृपा असते. हे लोक मेहनती, संतुलित स्वभावाचे आणि बुद्धिमान असतात. या गुणांमुळे ते जीवनात खूप यशस्वी होतात आणि श्रीमंतही होतात.
कर्क राशी (Cancer Horoscope)
कर्क राशीचे स्वामी चंद्र आहेत. या राशीचे लोक तीव्र बुद्धीचे आणि निर्णय घेण्यात ठाम असतात. ते नेहमी इतरांची मदत करण्यासाठी तयार असतात. हे लोक पैसा साठवण्यात कुशल असतात आणि खूप श्रीमंत होतात.
धनू राशी (Sagittarius Horoscope)
धनू राशीचे स्वामी देवगुरु आहेत, जे सुख, समृद्धी आणि सौभाग्य देणारे मानले जातात. हे लोक जन्मतः भाग्यवान असतात आणि त्यांच्यावर कुबेर देवाचीही कृपा असते. साधारणपणे या लोकांना पैसा आणि यश दोन्ही सहज मिळतं.