Lakshmi Narayan Rajyog Astrology: वैदिक ज्योतिषशास्त्र अभ्यासकांच्या माहितीनुसार, वर्ष २०२४ मध्ये जानेवारी महिन्यात सूर्य, बुध आणि शुक्र ग्रह राशीपरिवर्तन करणार आहेत. ७ जानेवारी २०२४ रोजी बुध ग्रह वृश्चिक राशीतून धनु राशीत प्रवेश करणार असून त्यापाठोपाठ १८ जानेवारी २०२४ ला शुक्र ग्रह धनु राशीत जाईल. धनु राशीत शुक्र-बुध युतीमुळे लक्ष्मी-नारायण योग तयार होणार आहे. ज्योतिषशास्त्रात लक्ष्मी नारायण राजयोग हा सर्वात लाभदायक व एखाद्याचे नशीब पूर्णपणे पालटून टाकणारा योग म्हणून पाहिला जातो. यामुळे १८ जानेवारी पासून प्रभावित राशींना अचानक धनप्राप्तीसह कोट्याधीश होण्याची संधी मिळू शकते. तुमची रास या नशीबवान राशींमध्ये समाविष्ट आहे का व असल्यास तुम्हाला नक्की कसा लाभ होऊ शकतो हे पाहूया…

लक्ष्मी नारायण राजयोगाने बदलणार नशीब; धनाची लक्ष्मी ठोठावेल दार

मेष रास (Aries Rashi Bhavishya)


लक्ष्मी नारायण राजयोग बनल्याने मेष राशीचे अच्छे दिन सुरु होणार आहेत. या राजयोगाची निर्मिती तुमच्या कुंडलीत कर्म भावी होत आहे. नोकरदार मंडळींना या कालावधीत पद व पगार दोन्हीमध्ये वाढ होऊ शकते. आर्थिक स्थितीनुसार तुमचे समाजातील स्थान सुद्धा अधिक दृढ होऊ शकते. बेरोजगार लोकांना या कालावधीत पद व पगारवाढ सुद्धा होऊ शकते.

सिंह रास (Leo Rashi Bhavishya)

लक्ष्मी नारायण योग व त्यात सूर्याचा प्रभाव यामुळे राशी सिंह राशीच्या लोकांसाठी सोनेरी दिवस सुरु होऊ शकतात. या राशीच्या लोकांना या काळात पैसाच पैसा मिळण्याची शक्यता आहे. वाडवडिलांच्या संपत्तीतून धनलाभ होऊ शकतो. आर्थिक बाजू तुमची भक्कम होऊ शकते. करिअरमध्ये उंच शिखर तुम्ही गाठू शकता. प्रेमविवाहाचे प्रयत्न यशस्वी होऊ शकतात. समाजात मान सन्मान वाढू शकतो.

कन्या रास (Virgo Rashi Bhavishya)


कन्या राशीच्या लोकांसाठी लक्ष्मी नारायण राजयोग अनुकूल ठरू शकतो. शुक्र व बुध तुमच्या कुंडलीच्या चौथ्या घरात गोचर करत आहे. यावेळी तुम्हाला भौतिक सुख मिळेल. मालमत्ता खरेदीचीही शक्यता आहे. काही परदेशी कराराच्या मदतीने तुम्हाला फायदा मिळू शकेल. तसेच, तुम्ही रिअल इस्टेट, प्रॉपर्टी डीलिंग, वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित काम करत असाल तर तुम्हाला चांगले फायदे मिळू शकतात.

तूळ रास (Libra Rashi Bhavishya)

लक्ष्मी-नारायण योगाच्या शुभ प्रभावामुळे आत्मविश्वास वाढेल. सकारात्मक दृष्टीकोनामुळे प्रगतीच्या मार्गावर असाल. भागीदारीत असलेला धंदा आर्थिक लाभात राहील. जुन्या आजारांपासून सुटका मिळू शकते. तुम्हाला अनपेक्षित असलेल्या व्यक्तींकडून मदतीचा हात पुढे केला जाऊ शकतो. काही नवीन नात्यांमधून प्रचंड धनप्राप्ती होऊ शकते. मन शांत राहील.

हे ही वाचा<< १७ जानेवारी पंचांग: शनीने आज कुंभेत पूर्ण केलं वर्ष’, रवी योगाने सजणार दिवस, मेष ते मीन राशीला कसा होईल लाभ?

कुंभ रास (Aquarius Rashi Bhavishya)

१८ जानेवारीपासून पुढे केलेली प्रत्येक गुंतवणूक लाभ मिळवून देऊ शकते. तुमच्या इच्छा पूर्ण होऊ शकतात. तुमच्या आर्थिक मिळकतीच्या कक्षा रुंदावण्याची शक्यता आहे. तुम्हाला संततीप्राप्तीचे योग आहेत आणि घरी येणाऱ्या याच नव्या पाऊलांच्या रूपात धनलक्ष्मीची कृपा सुद्धा लाभू शकते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)