Laxmi Narayan Rajyog: वैदिक पंचांगानुसार ग्रहांचा राजकुमार बुध सध्या कर्क राशीत भ्रमण करत आहे. पुढील १२ तासांत धनाचे दाता शुक्रही कर्क राशीत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे कर्क राशीत लक्ष्मी-नारायण राजयोग तयार होईल. याचा परिणाम सर्व राशींवर दिसेल.

पण अशा ३ राशी आहेत, ज्यांचे नशीब या काळात उजळेल. त्यांना अचानक धनलाभही होऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊया या भाग्यवान राशी कोणत्या आहेत…

मेष राशी (Aries Horoscope)

लक्ष्मी-नारायण राजयोग तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकतो. कारण हा योग तुमच्या राशीच्या चतुर्थ भावात होत आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला भौतिक सुख मिळू शकते. कुटुंबात आनंद आणि शांती राहील. घर सजवणे, नवे फर्निचर घेणे किंवा जमीन-जुमल्याचे निर्णय घेण्यासाठी हा वेळ चांगला आहे. आईसोबतचे नाते मजबूत होतील आणि कुटुंबात प्रेम व समज वाढेल. नोकरी करणाऱ्यांची पदोन्नती होऊ शकते. तसेच तुम्ही वाहन खरेदी करू शकता.

कर्क राशी (Cancer Horoscope)

लक्ष्मी-नारायण राजयोग कर्क राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. कारण हा योग तुमच्या राशीच्या लग्न भावात तयार होत आहे. त्यामुळे या काळात तुमचा आत्मविश्वास वाढेल. जर तुम्ही बऱ्याच काळापासून आजारी असाल तर तब्येत सुधारेल. भावंडांशी नातेसंबंध सुधारतील. विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन आनंदी राहील. तुम्हाला मान-सन्मान मिळेल. अविवाहित लोकांना लग्नाचे चांगले प्रस्ताव येऊ शकतात. तर विवाहितांच्या नात्यात प्रेम आणि जवळीक वाढेल.

वृश्चिक राशी (Scorpio Horoscope)

लक्ष्मी-नारायण राजयोग तुमच्यासाठी चांगला ठरू शकतो. कारण हा योग तुमच्या राशीच्या भाग्य आणि परदेश स्थानावर होत आहे. त्यामुळे या काळात तुमचे नशीब उजळू शकते. तुम्ही छोटी किंवा मोठी यात्रा करू शकता. तसेच धार्मिक किंवा मंगल कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. या काळात तुम्ही काही कठीण निर्णय घेऊ शकता, ज्यामुळे तुम्हाला फायदा होईल. नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी कौतुक मिळेल. तर स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळू शकते.