Shani and Guru Rajyog In Kundali: २०२२ या वर्षाचा शेवटचा महिना सुरु आहे. वर्षाचा अंत असला तरी हा काळ अनेकांच्या आयुष्यात शुभ पर्वाची सुरुवात ठरू शकतो. डिसेंबर महिन्यात लक्ष्मी मातेच्या कृपेने दोन अत्यंत शुभ योग तयार झाले आहेत. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार हे योग काही राशींसाठी येणाऱ्या महिन्याभरात तन, मन व धन लाभाचे अपार संकेत ठरत आहेत. या काळात माता लक्ष्मीचा काही राशींना कृपाशिर्वाद लाभणार आहे. ज्योतिष अभयस्कांच्या माहितीनुसार डिसेंबरच्या पहिल्याच दिवसापासून अनेक ग्रह आपले स्थान बदलत आहेत परिणामी सर्वच १२ राशींना आपल्या भाग्यात काही ना काही बदल अनुभवायला मिळणार आहेत, यातील काहींना शुभ तर काहींना अशुभ परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. नेमके हे योग कोणते व त्यांचा लाभ कुणाला होणार हे आपण जाणून घेऊयात..

शश योग

वैदिक ज्योतिष अभ्यासकांच्या माहितीनुसार ज्या मंडळींच्या कुंडलीत शश योग तयार होतो त्यांना आयुष्यात महत्त्वपूर्व व लाभदायक बदल अनुभवता येऊ शकतात. हा योग निर्माण करण्यामध्ये शनिचे योगदान असते परिणामी शनिच्या मार्गक्रमणाच्या गतीनुसार लाभाची गतीही मंद असू शकते. असं असूनही होणारे फायदे हे प्रचंड मोठे असल्याने तुम्हाला संयम बाळगल्याचा व मेहनतीचा लाभ होऊ शकतो.

कोणत्या राशींना होणार शनिच्या शश योगाचा लाभ?

वृषभ, तूळ व मकर राशीत शनिच्या मार्गक्रमणाने शश राजयोग तयार होत आहे. या राशींना येत्या काळात नव्या नोकरीचे प्रस्ताव लाभू शकतात. याचे मुख्य कारण म्हणेज शनि तुमच्या राशीत पाचव्या व नवव्या स्थानी स्थिर झाल्यावर शश योग तयार होतो. हे स्थान आर्थिक प्रगतीचे व कर्माचे स्थान आहे. शनि हा कर्म व न्याय देवता म्हणून ओळखला जातो परिणामी या राशींना कर्म उत्तम ठेवल्यास प्रचंड धनलाभ होऊ शकतो. तुम्ही नवीन गुंतवणूकीच्या संधींचा लाभ घेऊ शकता मात्र त्यासाठी योग्य तो सल्ला घेणे विसरु नका. येत्या काळात कौटुंबिक सुखाचे योग आहेत मात्र थोडेफार वादही होऊ शकतात या काळात जिभेवर साखर व डोक्यावर बर्फ ठेवणे हिताचे ठरेल.

हंस महापुरुष योग

ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हा कोणत्या राशीच्या कुंडलीत गुरु मार्गी होऊन चौथ्या, सातव्या व दहाव्या भावात स्थिर होतो तेव्हा हंस महापुरुष योग साधला जातो. हा योग,तर्कबुद्धी व्यवसायात व धनलाभाषे संबंधित आहे. याचा प्रभाव तुमच्या राशीत जेव्हा सुरु होतो तेव्हा या मंडळींना दीर्घ आयुष्य व समृद्धी प्राप्त होण्याची चिन्हे असतात. कुंडलीत हंस महापुरुष योग तयार होणे हे अत्यंत शुभ मानले जाते.

हे ही वाचा<< १३ जानेवारी २०२३ ला मंगळ होणार मार्गी; ‘या’ ४ राशींना प्रचंड धनलाभाची संधी; पाहा तुम्ही आहात का ते भाग्यवान?

कोणत्या राशींना होणार गुरुच्या हंस महापुरुष योगाचा लाभ?

कर्क, कन्या, वृश्चिक या तीन राशींना हंस महापुरुष राजयोगाचा लाभ होऊ शकतो. बँकेचे व्यवहार तुम्हाला काळजीपूर्वक करण्याची गरज आहे. योग्य सल्लागाराच्या मदतीने आपण बँक गुंतवणुकीतूनच मोठा लाभ मिळवू शकता. कमी मेहनत व अधिक लाभ असा फायद्याचा काळ तुमची वाट पाहत आहे. वैवाहिक जीवनात मतभेद झाल्यास तुम्हाला कमीपणा घ्यावा लागू शकतो पण असे करणे तुमच्या मानसिक स्वास्थ्यासाठी सर्वोत्तम ठरू शकते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीच्या आधारे लिहिलेला आहे)