Laxmi Narayan Rajyog 21 August: वैदिक ज्योतिषात अनेक शुभ आणि राजयोग सांगितले आहेत. जन्मपत्रिकेत हे योग असले तर माणसाला सगळे भौतिक सुख मिळते आणि आयुष्यात धन-संपत्ती टिकून राहते.
सध्या बुध ग्रह कर्क राशीत आहेत आणि २१ ऑगस्टला शुक्र ग्रहही कर्क राशीत येतील. त्यामुळे कर्क राशीत लक्ष्मी नारायण राजयोग बनेल. तसेच मंगळ आणि शनि नवपंचम योग तयार करत आहेत. यामुळे काही राशींचे नशीब उजळू शकते. या राशींना अचानक धनलाभ आणि भाग्य वाढण्याची शक्यता आहे. चला तर जाणून घेऊ या, त्या भाग्यवान राशी कोणत्या आहेत.
तूळ राशी (Libra Horoscope)
लक्ष्मी नारायण राजयोग आणि नवपंचम राजयोग तुला राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. कारण हा राजयोग तुमच्या राशीपासून करिअर आणि व्यवसायाच्या स्थानी होईल. त्यामुळे नोकरी शोधत असलेल्या लोकांना या काळात नोकरी मिळू शकते. तसेच नवीन भागीदारी आणि व्यापारात यश मिळण्याची शक्यता आहे. या काळात आत्मविश्वास वाढेल आणि करिअरमध्ये प्रगती दिसेल. नातेसंबंधातही सामंजस्य राहील. याच वेळी वडिलांशी संबंध चांगले राहतील. तसेच नोकरी करणाऱ्यांची पदोन्नती होऊ शकते.
कुंभ राशी (Aquarius Horoscope)
लक्ष्मी नारायण राजयोग आणि नवपंचम राजयोग कुंभ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. कारण हा राजयोग तुमच्या राशीपासून सहाव्या स्थानी होणार आहे. त्यामुळे कायदेशीर प्रकरणांचा निकाल तुमच्या बाजूने येईल आणि करिअरमध्ये नवे यश मिळेल. संधी ओळखा आणि आपल्या जोडीदारासोबत वेळ घालवा. या काळात गुप्त शत्रूंवर विजय मिळेल. तसेच तुमच्या उत्पन्नात मोठी वाढ होऊ शकते.
कर्क राशी (Cancer Horoscope)
नवपंचम राजयोग आणि लक्ष्मी नारायण राजयोग तयार झाल्याने कर्क राशीच्या लोकांचे चांगले दिवस सुरू होऊ शकतात. कारण हा राजयोग तुमच्या राशीपासून लग्न भावात होणार आहे. त्यामुळे या काळात तुमच्या व्यक्तिमत्त्वात चमक येईल. तुम्हाला मान-सन्मान मिळेल. करिअरमध्ये नवी सुरुवात होईल. संवाद कौशल्ये सुधारतील. तुम्हाला चांगला आर्थिक फायदा होईल आणि या काळात तुम्ही पैसे साठवण्यात यशस्वी ठराल.