8/8 Lion’s Gate Portal & August 2025: आज तारीख आहे ८/८/२०२५, म्हणजेच आजच्या दिवशी सर्व ग्रहांची अलाइनमेंट उच्चतम सीमेवर असते आणि त्यामुळे पृथ्वीच्या वातावरणात एक हाय एनर्जी पोर्टल तयार होते, ज्याला स्टारगेट पोर्टल असेही म्हणतात. प्राचीन इजिप्तमध्ये ८/८ लायन्स गेट पोर्टल हा एक शक्तिशाली दिवस आहे, जेव्हा सिंह राशीतील सूर्य उगवत्या सीरियसशी जुळतो, जो मॅनिफेस्टींगसाठी उच्च ऊर्जा पोर्टल तयार करतो. आठ क्रमांक आध्यात्मिक विकासही दर्शवतो. लायन्स गेट पोर्टल म्हणजे, या दिवशी लिहिलेल्या इच्छा, आपली स्वप्न पूर्ण होतात. चला तर मग ८/८ लायन्स गेट पोर्टलबद्दल अधिक जाणून घेऊया..

सूर्याशी सीरियस संरेखन : हे संरेखन स्पष्टता, प्रकाश आणि अध्यात्माबद्दल ज्ञान देते.

सिंह राशीची ऊर्जा : सिंह राशी ऊर्जा, धैर्य, शक्ती आणि निर्भयता दर्शवते.

८/८ : अंकशास्त्रानुसार ही संख्या शनी दर्शवते जी परिवर्तन, यश आणि कर्माची स्पष्टता दर्शवते.

पौर्णिमा : ही संख्या पौर्णिमेशी संरेखित आहे, जी त्याला अधिक विशेष आणि शक्तिशाली बनवते.

वर उल्लेख केलेल्या कारणांमुळे आजचा दिवस आणि रात्र विविध आध्यात्मिक क्रियाकलाप करण्यासाठी आणि जीवनात तुम्हाला जे हवे आहे ते मिळवण्यासाठी अधिक शक्तिशाली आहे. चला तर मग जाणून घेऊयात या इच्छा पूर्ण कशा होणार?

मॅनिफेस्टींग करण्याची योग्य वेळ

आज रात्री ०८:०८ वाजता तुम्हाला जे हवंय त्यासाठी मॅनिफेस्टींग करण्याची योग्य वेळ आहे. मॅनिफेस्ट हे एक तत्व आहे, ज्यानुसार आपण आपल्या जीवनात विचार प्रकट करतो. समजा तुम्ही एखादे काम करण्यात तुमची सर्व मेहनत लावत असाल, पण तुमच्या मनात भीती आहे की तुम्हाला त्या कामात यश मिळणार नाही, तर अपयशाची भीती वाढते. कारण आपण आपल्या मनात अपयशाला महत्त्व दिले आहे.

मॅनिफेस्टींग कसे करावे

सर्वप्रथम तुमचे ध्येय तुमच्या मनात स्पष्ट करा. या ध्येयाबाबत मनात कोणतीही शंका नसावी. तसेच याच्याशी संबंधित सर्व नकारात्मक विचार तुमच्या मनातून काढून टाका. तुम्हाला फक्त तुमची सर्व शक्ती तुमच्या ध्येयावर केंद्रित करायची आहे. काही श्वासोच्छ्वासाचे व्यायाम आणि ध्यान तुम्हाला या कामात मदत करू शकतात.

आता तुम्हाला काय हवे आहे हे तुम्हाला स्पष्ट झाले आहे, तुमच्या मनात त्याची पूर्ण कल्पना करा आणि मग तुमची इच्छा त्याच फॉर्ममध्ये कागदावर लिहा. तुमची लिहिण्याची पद्धत अशी नसावी की तुम्ही काहीतरी विचारत आहात किंवा इच्छित आहात. त्यापेक्षा तुम्हाला ती गोष्ट मिळाली आहे आणि त्याबद्दल तुम्ही आभारी आहात असे लिहायचे आहे.

ध्यान

स्वतःला शक्तिशाली बनवण्यासाठी आणि तुमची स्वप्ने सत्यात उतरताना पाहण्याचा ध्यान हा सर्वात शक्तिशाली मार्गांपैकी एक आहे.