Gajlakshmi Rajyog: वैदिक पंचांगानुसार, ४ ऑगस्ट रोजी अनेक शुभ योग तयार होत आहेत, ज्यामुळे काही राशींचं नशीब उजळू शकतं. या दिवशी मिथुन राशीत गुरुंसोबत शुक्रही विराजमान असतील, ज्यामुळे गजलक्ष्मी राजयोग तयार होतोय. त्याचबरोबर, या दिवशी गुरु आणि सूर्य यांच्यात द्विद्वादश योग देखील तयार होतोय. या शुभ योगांमुळे काही राशीच्या लोकांना चांगला फायदा होऊ शकतो. चला तर मग, जाणून घेऊया या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत…
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, ४ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजून १० मिनिटांनी सूर्य आणि गुरु एकमेकांपासून ३० अंशाच्या अंतरावर असतील, त्यामुळे द्विद्वादश योग तयार होत आहे. याच दिवशी गुरु आणि शुक्र एकत्र येऊन गजलक्ष्मी राजयोग तयार करत आहेत आणि सूर्य कर्क राशीत राहून बुधासोबत मिळून बुधादित्य योग तयार करत आहेत.
वृषभ राशी (Taurus Horoscope)
या राशीच्या लोकांसाठी द्विद्वादश योग खूपच शुभ ठरू शकतो. खूप दिवसांपासून रखडलेली कामं पूर्ण होऊ शकतात आणि धन-संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे.
तुमची जी काही कामं अडकली होती, ती आता पूर्ण होऊ शकतात. शिव शंकराच्या कृपेने कमाईचे नवीन मार्ग सुरू होऊ शकतात, त्यामुळे आर्थिक स्थिती सुधारू शकते.
कुटुंबासोबत चांगला वेळ घालवता येईल. घरात आणि कुटुंबात सुरू असलेल्या अडचणी कमी होऊ शकतात. भाऊ-बहीणांसोबतचे संबंध चांगले होतील. नोकरीच्या क्षेत्रातही फायदा होऊ शकतो. व्यवसायात तुम्ही बनवलेली योजना यशस्वी ठरू शकते.
कन्या राशी (Virgo Horoscope)
या राशीच्या लोकांसाठी गुरु-सूर्याचा द्विद्वादश योग खूप लाभदायक ठरू शकतो. या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते. खूप दिवसांपासून अडकलेले काही काम पूर्ण होऊ शकते. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवता येईल.
विदेशातून फायदा मिळण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी हा योग खूप लकी ठरू शकतो. तुमच्या कामाचे कौतुक होईल. नेतृत्व क्षमता वाढू शकते, ज्यामुळे तुमच्यावर मोठ्या जबाबदाऱ्या येऊ शकतात.
पदोन्नती आणि पगारवाढीचे योग तयार होत आहेत. वडील, गुरु यांचं पूर्ण सहकार्य मिळू शकतं, ज्यामुळे तुम्ही तुमचं उद्दिष्ट गाठू शकता.
तूळ राशी (Libra Horoscope)
या राशीच्या लोकांवरही भगवान शिवची विशेष कृपा होऊ शकते. आयुष्यात आनंदाचे क्षण येऊ शकतात. तुम्ही जे काम करत आहात, त्यात तुम्हाला यश मिळू शकते. कोर्ट-कचेरीच्या बाबतीत मोठं यश मिळण्याची शक्यता आहे. पद आणि प्रतिष्ठा मिळू शकते. वडिलांसोबतचा तणाव संपून जाईल.
अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. वैवाहिक जीवनातील अडचणी कमी होऊ शकतात. पार्टनरसोबत चांगला वेळ घालवता येईल आणि नातं अधिक मजबूत होईल.
तुम्ही नवीन नोकरीसाठी जे प्रयत्न करत आहात, ते यशस्वी ठरू शकतात.