Maghi Ganesh Jayanti 2023 Shubh Muhurt: शुभ कार्य करण्यापूर्वी गणपतीची आराधना केली जाते. पौराणिक मान्यतेनुसार माघ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणपतीचा जन्म झाला. हिंदू धर्मग्रंथानुसार माता पार्वतीने श्री गणेशाची निर्मिती अंगाच्या मळापासून केली होती. त्या दिवशी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाची चतुर्थी होती. जो कोणी चतुर्थीच्या दिवशी श्रीगणेशाची आराधना करतो त्याला दैवी सुख प्राप्त होते आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशी मान्यता आहे. या वर्षी माघी गणेश जयंतीची तिथी २४ जानेवारीला सुरु होत आहे तर उदयतिथीला गणेश जयंती साजरी होणार आहे. यंदा गणपती बाप्पांनी आपल्या आगमनाला तीन अत्यंत शुभ मुहूर्त जुळवून आणले आहेत.

माघी गणेश जयंती कधी आहे?

माघी गणेश चतुर्थी प्रारंभ – २४ जानेवारी २०२३ दुपारी ३ वाजून २२ मिनिट
माघी गणेश चतुर्थी समाप्ती- २५ जानेवारी २०२३ दुपारी १२ वाजून ३४ मिनिट

शुभ मुहूर्त

द्रिक पंचांगाच्या माहितीनुसार २५ जानेवारी २०२३ ला सकाळी ११ वाजून २९ मिनिटांनी शुभ मुहूर्त सुरु होणार असून दुपारी १२ वाजून ३४ मिनिटांनी मुहूर्त समाप्त होणार आहे. माघी गणेश जयंतीला विनायक चतुर्थी म्हणूनही ओळखले जाते. भाद्रपद चतुर्थी प्रमाणे माघी गणेश जयंतीला सुद्धा चंद्राचे दर्शन घेऊ नये असे सांगितले जाते.

हे ही वाचा<< Photos : माघी गणेशोत्सवाची लगबग, बाप्पाला सजवण्यात मूर्तीकार मग्न

माघी गणेश जयंतीला जुळून आले शुभ योग

रवि योग- २५ जानेवारी सकाळी ७ वाजून १३ मिनिट ते रात्री ८ वाजून ५ मिनिट
शिव योग- २५ जानेवारी सकाळी ८ वाजून ५ मिनिट ते रात्री ११ वाजून १० मिनिट
परिघ योग- २५ जानेवारी पहाटे ते संध्याकाळी ६ वाजून १६ मिनिट

हे ही वाचा<< Virgo Yearly Horoscope 2023: कन्या राशीला लक्ष्मी कधी देणार धनलाभ? सोनल चितळेंकडून जाणून घ्या १२ महिन्यांचे राशीभविष्य

माघी गणेश जयंती: पूजा विधी

श्रीगणेशाची स्थापना करताना त्यांना सुपारी आणि पान अर्पण करण्याची पद्धत आहे. गणेशाला पिवळी फुले, पिवळे वस्त्र आणि पिवळी मिठाई अर्पण करणे शुभ मानले जाते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.)