Powerful Mahabhagya Yog on 25 August: वैदिक ज्योतिषानुसार सध्या भूमिपुत्र मंगळ कन्या राशीत आहेत. लवकरच मंगळाची युती चंद्रासोबत होणार आहे. जेव्हा मंगळ आणि चंद्र एकत्र येतात तेव्हा त्या संयोगाला महाभाग्य योग किंवा चंद्र-मंगळ योग म्हणतात. यावेळी हा संयोग झाल्यामुळे १२ राशींवर परिणाम दिसेल, पण तीन राशींना याचा खास मोठा फायदा होईल.

वैदिक पंचांगानुसार २५ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजून २८ मिनिटांनी चंद्र कन्या राशीत प्रवेश करतील, जिथे आधीपासून मंगळ उपस्थित असतील. अशा प्रकारे दोन्ही ग्रहांच्या युतीने महालक्ष्मी राजयोग तयार होईल. हा शुभ योग २७ ऑगस्ट संध्याकाळी ७ वाजून २१ मिनिटांपर्यंत प्रभावी राहील.

ज्योतिषशास्त्रात असे मानले जाते की जेव्हा मंगळ आणि चंद्र एकत्र येतात, तेव्हा अनेक गोष्टींवर चांगला परिणाम होतो. आर्थिक स्थिती मजबूत होते. मनाला शांती मिळते आणि आत्मविश्वास वाढतो. नातेसंबंध गोड होतात. करिअर आणि नोकरीमध्ये नवे संधी मिळतात.

मेष राशी (Aries Horoscope)

या राशीच्या लोकांना चंद्र-मंगळ योगाचा खास फायदा होईल. आत्मविश्वास आणि ऊर्जा वाढेल. करिअरमध्ये नव्या संधी मिळतील आणि जोडीदारासोबत छान वेळ जाईल. प्रवासाची शक्यता आहे आणि संयम ठेवल्यास नातेसंबंध अधिक मजबूत होतील.

वृषभ राशी (Taurus Horoscope)

वृषभ राशीच्या लोकांसाठी हा योग कामाच्या ठिकाणी प्रगती आणि मान-सन्मान मिळवून देऊ शकतो. खास करून आयटी, तंत्रज्ञान, डेटा सायन्स आणि रिसर्चशी संबंधित लोकांना फायदा होईल. सहकाऱ्यांसोबत मतभेद होऊ शकतात, पण समतोल आणि संयम ठेवला तर यश मिळेल.

धनु राशी (Sagittarius Horoscope)

धनु राशीच्या लोकांसाठी हा काळ आनंदाने भरलेला असेल. आत्मविश्वास वाढेल आणि प्रेमसंबंध अधिक मजबूत होतील. करिअरमध्ये नव्या संधी मिळतील. मात्र, कुठल्याही निर्णयात घाई करणं टाळावं. संयम आणि समतोल ठेवला तर यश नक्की मिळेल.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)