Mahashivratri Vishesh Rashi Bhavishya In Marathi : २६ फेब्रुवारी २०२५ रोजी माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी आहे. त्रयोदशी तिथी बुधवारी सकाळी ११ वाजून ८ मिनिटांपासून सुरु होईल. आज परीघ योग २६ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजून ५७ मिनिटांपर्यंत जुळून येईल. तसेच श्रवण नक्षत्र सायंकाळी ५ वाजून २३ मिनिटांपर्यंत जागृत असेल.राहू काळ १२ वाजता सुरु होईल ते १ वाजून ३० मिनिटांपर्यंत असणार आहे.

याशिवाय २६ फेब्रुवारीला महाशिवरात्री (Mahashivratri) आहे. भगवान शंकराच्या भक्तांसाठी हा दिवस अत्यंत खास असतो. पौराणिक कथेनुसार शिव आणि पार्वती यांच्या लग्नाची तारीख महाशिवरात्री म्हणून ओळखली जाते. महाशिवरात्र तिथीची सुरुवात २६ फेब्रुवारी सकाळी ११ वाजून ८ मिनिटांनी सुरू होईल. महाशिवरात्र तिथीची समाप्ती २७ फेब्रुवारी सकाळी ८ वाजून ८ मिनिटांपर्यंत असेल. तर आज महादेव आणि माता पर्वती तुम्हाला कसा देणार आशीर्वाद हे आपण जाणून घेऊया…

२६ फेब्रुवारी पंचांग व राशिभविष्य

मेष:- नवीन मित्र जोडले जातील. आपला दबदबा निर्माण कराल. इतरांना मदत करण्याचा आनंद घ्याल. सर्वांशी आपलेपणाने वागाल.

वृषभ:- कुटुंबात तुमचे वर्चस्व राहील. जवळचे नातेवाईक भेटतील. तुमच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जाईल. विषयाला उगाचच फाटे फोडू नका. उष्णतेचे त्रास संभवतात.

मिथुन:- जवळचा प्रवास आनंददायी होईल. भावंडांशी सलोखा वाढेल. जोडीदाराचा हट्ट पुरवावा लागेल. विचारात एकसूत्रता आणावी लागेल. एकाच वेळी ढीगभर कामे अंगावर घेऊ नका.

कर्क:- कौटुंबिक वातावरण हसते खेळते असेल. तुमच्या मताचा आदर केला जाईल. घरगुती वाता वरणात गुंग व्हाल. आवडीचे पदार्थ चाखायला मिळतील. मनातील इच्छा पूर्ण होतील.

सिंह:- तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडेल. जोडीदाराची प्राप्ती वाढेल. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. मुलांची काळजी लागून राहील. लोक तुमच्याकडे आकर्षिले जातील.

कन्या:- अति विचार करत बसू नका. कामाच्या ठिकाणी कुशाग्र बुद्धीचा वापर कराल. घरात काही बदल करावे लागतील. कामातून समाधान शोधण्याचा प्रयत्न करावा. स्थावरचे प्रश्न सोडवावेत.

तूळ:- कर्तबगारीला चांगला वाव मिळेल. तुमच्यातील महत्वाकांक्षा वाढीस लागेल. वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे. जवळच्या प्रवासात काळजी घ्यावी. हाता पायास किरकोळ इजा संभवते.

वृश्चिक:- पैशांची उधळपट्टी टाळावे. कुटुंबात आपले वर्चस्व गाजवाल कर्तृत्व दाखवण्याची संधि सोडू नका. कौटुंबिक प्रश्न चर्चेने सोडवावेत. रागावर नियंत्रण ठेवावे.

धनू:- क्षुल्लक गोष्टींकडे दुर्लक्ष करावे. वडिलोपार्जित कामे निघतील. आपली बुद्धिमत्ता दाखवण्याची संधि मिळेल. परोपकाराची जाणीव ठेवाल. धार्मिक कार्यात हिरीरीने भाग घ्याल.

मकर:- शांत व संयमी विचार करावा. कौटुंबिक खर्चाचा पुनर्विचार करावा लागेल. बोलण्याच्या भारात जबाबदारी घेण्याचे टाळावे. जुन्या गोष्टी उगाळत बसू नका. सामुदायिक वादात सहभाग घेऊ नये.

कुंभ:- बौद्धिक ताण राहील. कामाचा वाढता व्याप लक्षात घ्यावा. वडीलधार्‍यांचा सन्मान करावा. जोडीदाराचे मत मान्य करावे लागेल. हातातील कलेसाठी वेळ काढावा.

मीन:- कामाच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल. नातेवाईकांची मदत घेता येईल. सहकार्‍यांच्या साथीत रमून जाल. गोड बोलून सर्वांना आपलेसे कराल. खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर