Mahalakshmi Yog 2025 impact In Marathi: ज्योतिषशास्त्रामध्ये असे अनेक शुभ योग आहेत, हे योग कुंडलीत असतील तर व्यक्तीला कशाचीही कमी पडत नाही. या शुभ योगांना राजयोग म्हणतात. यामध्ये व्यक्तीला त्याच्या सत्कर्माचे अत्यंत शुभ फळ मिळतात. त्याला राजाप्रमाणे जीवन आणि भौतिक सुख-सुविधा मिळतात. ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या स्थितीनुसार निर्माण होणारे राजयोग काही राशींच्या नशिबाचे दार उघडतात, असे म्हणतात. असाच एक शक्तिशाली ‘महालक्ष्मी राजयोग’ ९ जून २०२५ रोजी तयार होतोय, जो काही निवडक राशींवर लक्ष्मीमातेची कृपा घेऊन येणार आहे. चंद्र आणि मंगळ यांचा खास संयोगातून हा योग निर्माण होत असून, त्याचा प्रभाव काही राशींवर राहणार आहे.

९ जून रोजी सकाळी ८:५० वाजता चंद्र वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे आणि त्याचवेळी मंगळ सिंह राशीत विराजमान आहे. चंद्रावर मंगळाची दृष्टि पडत असल्याने ‘महालक्ष्मी राजयोग’ तयार होत आहे. हा योग अत्यंत दुर्मीळ मानला जातो आणि आर्थिक लाभ, करिअरमध्ये उन्नती व मानसिक समाधान देणारा ठरतो. परिणामी सर्वच राशींवर याचा सकारात्मक प्रभाव दिसून येऊ शकतो. मात्र तीन अशा राशी आहेत ज्यांना या राजयोगाचा सर्वाधिक लाभ होऊ शकतो. या ३ राशींना यशप्राप्तीचे प्रबळ योग आहेत. या राशी कोणत्या चला तर जाणून घेऊयात..

महालक्ष्मी राजयोग; ‘या’ राशींचं नशीब फळफळणार?

मिथुन (Gemini)

महालक्ष्मी योगामुळे मिथुन राशीच्या लोकांना करिअरमध्ये अनपेक्षित प्रगतीची संधी मिळू शकते. आर्थिक अडचणी दूर होऊ शकतात. ज्या कंपनीत काम करत आहात तिथून प्रमोशन किंवा बोनस मिळू शकतो. नोकरी बदलायची इच्छा असेल तर चांगल्या ऑफर्स मिळू शकतात. खर्चावर नियंत्रण राहील आणि मानसिक समाधान मिळेल. वैवाहिक आयुष्यात आनंद राहील. आरोग्यही चांगलं राहील.

सिंह (Leo)

सिंह राशीसाठी महालक्ष्मी राजयोग अतिशय लाभदायक सिद्ध होऊ शकतो. करिअरमध्ये नवीन वाटा खुल्या होऊ शकतात. नोकरीतील बदल किंवा नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्याची संधी येईल. पैशांची आवक वाढून बचत करण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकतात. प्रेमसंबंधात गोडवा निर्माण होईल आणि आरोग्य उत्तम राहील. समाजात मान सन्मान वाढू शकतो.

तूळ (Libra)

तूळ राशीच्या लोकांसाठी हा काळ सुवर्णसंधी घेऊन येणारा ठरु शकतो. कामाच्या ठिकाणी मान-सन्मान आणि वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. जुने वाद मिटून जातील आणि कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. अनेक स्रोतांमधून धनलाभ होऊ शकतो, विशेषतः वडिलोपार्जित संपत्तीमधून काही चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायातही मोठी उडी घेता येऊ शकते.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.