Mahalakshmi Yog 2025 Impact in Marathi:  ज्योतिषशास्त्रानुसार, २९ जून २०२५ रोजी एक अत्यंत शुभ योग तयार होतो आहे, ज्याला ‘महालक्ष्मी योग’ असे म्हटले जाते. ज्योतिषशास्त्रात महालक्ष्मी राजयोग हा खूप शुभ मानला जातो, ज्याच्या प्रभावामुळे व्यक्तीला धन, समृद्धी व यश मिळते.  चंद्र आणि मंगळ यांच्या युतीमुळे सिंह राशीत हा शक्तिशाली योग तयार होत असून, काही विशिष्ट राशींसाठी हा काळ अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. हा योग धनप्राप्ती, यश, मानसिक समाधान आणि पारिवारिक आनंद घेऊन येऊ शकतो.

२९ जून रोजी सकाळी ६.३३ वाजता चंद्र सिंह राशीत प्रवेश करील आणि १ जुलैपर्यंत तिथेच राहील. यादरम्यान मंगळही सिंह राशीत असल्यामुळे चंद्र-मंगळ युती तयार होईल. त्यामुळे महालक्ष्मी योग घडून येईल. हा योग सुमारे ५४ तासांपर्यंत प्रभावी राहणार आहे. या कालावधीत काही भाग्यशाली राशींच्या जीवनात अचानक आर्थिक लाभ, प्रतीक्षित कामांमध्ये यश, तसेच सामाजिक सन्मान यांसारखे सकारात्मक बदल होऊ शकतात. चला तर पाहूयात कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…

‘या’ राशी ठरणार भाग्यशाली!

मिथुन (Gemini)

या राशीसाठी हा योग सहाव्या भावात तयार होत आहे. त्यामुळे मानसिक तणाव कमी होईल, आत्मविश्वास वाढेल आणि कार्यक्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याने नाव आणि पैसा मिळू शकतो. या काळात प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. भाऊ-बहीण आणि मित्रपरिवारासोबत नातेसंबंध सुधारु शकतात. व्यवसायातून मोठा लाभ होऊ शकतो. नव्या-जुन्या गुंतवणुकीतून जास्त फायदा होऊ शकतो. पैसे कमावण्याच्या नवीन संधी मिळू शकतात.

तूळ (Libra)

या राशीच्या लाभ भावात महालक्ष्मी योग तयार होत आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांच्या आर्थिक अडचणी दूर होऊ शकतात. अचानक धनप्राप्ती, कर्जमुक्ती व मानसिक शांती लाभू शकते. नोकरी किंवा व्यवसायात यश मिळू शकतो. जोडीदारासोबतचे संबंध गोड होऊ शकतात आणि धार्मिक कार्यात सहभागी होण्याचे योग आहेत. कुटुंबात सुख-समृद्धी येऊ शकते.

मीन (Pisces)

या राशीसाठीही सहाव्या भावात हा योग तयार होतो आहे. त्यामुळे उत्पन्नाचे नवीन स्रोत तुमच्यासाठी खुले होऊ शकतात, प्रतिष्ठा वाढेल आणि यशाच्या दिशा उजळतील. अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो. बेरोजगारांना नोकऱ्या मिळू शकतात. घरगुती वातावरण आनंददायक राहील. मेहनतीचे फळ मिळेल, तुमच्या उत्पन्नात मोठी वाढ होऊ शकते. त्याचबरोबर वाहन आणि मालमत्तेचे सुख मिळू शकते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून, ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)