Mars Gochar 2023: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचा सेनापती मंगळ स्वतःची राशी वृश्चिकमध्ये प्रवेश करणार आहे. मंगळ हा भूमी, शौर्य आणि संपत्तीचा स्वामी मानला जातो. त्यामुळे जेव्हा जेव्हा मंगळाच्या चालीत बदल होतो तेव्हा या क्षेत्रांसह सर्व राशींवर परिणाम होतो. परंतु अशा ३ राशी आहेत ज्यांची मंगळाच्या गोचरमुळे आर्थिक प्रगती होऊ शकते. तर या भाग्यवान राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊ या.

मीन रास –

मीन राशीच्या लोकांसाठी मंगळाचे राशी परिवर्तन फायदेशीर ठरू शकते. कारण मंगळ तुमच्या राशीच्या बाराव्या स्थानाचा स्वामी आहे. तसेच मंगळ तुमच्या राशीतून नवव्या स्थानी जाणार आहे. जे भाग्याचे स्थान मानले जाते. त्यामुळे या काळात तुमचे नशीब चमकू शकते. तुम्हाला काही महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये यश मिळू शकते. भूतकाळात केलेल्या गुंतवणुकीतून चांगला परतावा देखील मिळू शकतो. तसेच, या काळात तुम्ही प्रवास करू शकता, जो तुमच्यासाठी शुभ सिद्ध होऊ शकतो.

कर्क रास –

कर्क राशीच्या लोकांसाठी मंगळाचे राशी परिवर्तन अनुकूल ठरू शकते. कारण मंगळ तुमच्या कुंडलीच्या पाचव्या स्थानात भ्रमण करणार आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला तुमच्या मुलाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. मालमत्तेच्या खरेदी-विक्रीत तुम्हाला लाभ होऊ शकतो. मंगळ तुमच्या राशीच्या कर्म स्थानाचा स्वामी आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला नोकरी – व्यवसायात चांगले यश मिळू शकते. तसेच बेरोजगारांनाही नोकरीची संधी उपलब्ध होऊ शकते.

हेही वाचा- पुढील महिन्याच्या सुरुवातीला ‘या’ राशींचे अच्छे दिन सुरु? शुक्र कन्या राशीत प्रवेश करताच मिळू शकतो गडगंज पैसा

वृश्चिक रास –

मंगळाचे गोचर तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कारण मंगळ तुमच्या राशीतून लग्न घरात जाणार आहे. त्यामुळे या काळात तुमचे धैर्य आणि शौर्य वाढून तुमच्या आत्मविश्‍वासातही वाढ होऊ शकते. त्यामुळे तुम्ही जमीन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. तसेच, स्पर्धात्मक परीक्षेला बसणाऱ्यांना यश मिळू शकते. नोकरदारांचे प्रमोशन होऊ शकते. तर क्रीडा, पोलीस, सैन्य आणि गुप्तहेर संस्थांशी संबंधित लोकांसाठी हा काळ चांगला ठरु शकतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)