Mangal Gochar 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, मंगळ ग्रह १८ महिन्यांनी राशी बदल करतो. तसेच तो मेष आणि वृश्चिक राशीचा स्वामी मानला जातो. सध्या मंगळ सिंह राशीत भ्रमण करत आहे, जिथे तो केतुशी युती करत आहे. तर मंगळ २८ जुलै रोजी कन्या राशीत प्रवेश करणार आहे, ज्यामुळे काही राशींचे भाग्य बदलू शकते. तसेच, या राशींना यावेळी अचानक आर्थिक लाभ मिळू शकतो, त्यांच्या सुख-समृद्धीत वाढ होऊ शकते. पण कोणत्या राशींना याचा फायदा होईल जाणून घेऊ..
वृश्चिक (Scorpio Zodiac Sign)
मंगळ गोचर वृश्चिक राशीसाठी शुभ ठरू शकते. या काळात तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ होऊ शकते, उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. नवीन काम सुरू करण्यासाठी किंवा मोठे ध्येय साध्य करण्यासाठी हा काळ उत्तम आहे, तुम्हाला कला, लेखन किंवा इतर क्रिएटिव्ह फिल्ड्समध्ये यश मिळू शकेल. मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते.
सिंह (Leo Zodiac Sign)
मंगळाचे गोचर सिंह राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. या काळात तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात. कोणत्याही कामात तुम्हाला नशीबाची साथ देऊ शकते. तुम्ही देशांतर्गत आणि परदेशात प्रवास करू शकता. ध्येय साध्य करण्यात यशस्वी व्हाल आणि आत्मविश्वासाने निर्णय घ्याल. तुमची ओळख मजबूत करण्यासाठी आणि नेतृत्वाची भूमिका बजावण्यासाठी हा काळ उत्तम आहे. वाहन किंवा मालमत्ता खरेदीसाठी हा उत्तम काळ आहे, तुम्हाला प्रत्येक कामात आईचा पाठिंबा मिळेल.
मकर (Capricorn Zodiac Sign)
मंगळ गोचर मकर राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकते. या काळात कामानिमित्त किंवा व्यवसायानिमित्त तुम्हाला प्रवासाची संधी मिळेल. घरी काही शुभ किंवा धार्मिक कार्यक्रम होऊ शकतात. तुम्हाला सन्मान आणि प्रतिष्ठा मिळू शकते. आध्यात्मिक दृष्टिकोनातून तुम्ही ध्येय साध्य करण्यास मदत होईल. जर तुम्ही कोणत्याही अभ्यासक्रमात, संशोधनात किंवा धार्मिक कार्यात सहभागी असाल तर या काळात तुम्हाला यश आणि प्रेरणा मिळेल. स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणत्याही परीक्षेत यश मिळू शकते.