Mangal Gochar in Kanya Rashi: वैदिक पंचांगानुसार, २८ जुलैच्या रात्री ग्रहांचा सेनापती मंगळ कन्या राशीत प्रवेश करणार आहे. ज्योतिषशास्त्रात मंगळाला अग्नी तत्वाचा आणि क्रूर ग्रह मानले जाते. त्याला ऊर्जा, धैर्य आणि संघर्षाचे प्रतीक समजले जाते.

असे म्हणतात की, जर एखाद्याच्या कुंडलीत मंगळ कमजोर असेल तर त्याला आरोग्य, नातेसंबंध आणि पैशांशी संबंधित अडचणी येऊ शकतात. पण, जेव्हा मंगळ आपली राशी बदलतो, तेव्हा काही राशींच्या जीवनात मोठे बदल घडतात. चला तर मग पाहूया की यावेळी मंगळाचं गोचर कोणत्या राशीसाठी अशुभ ठरू शकतं.

मिथुन राशी (Gemini Horoscope)

मिथुन राशीच्या लोकांसाठी मंगळाचं कन्या राशीत होणारं गोचर त्रासदायक ठरू शकतं. या काळात अचानक खर्च वाढू शकतो. आरोग्याच्या तक्रारी होऊ शकतात. घरगुती जीवनात तणाव वाढू शकतो. जोडीदारासोबत मतभेद होण्याची शक्यता आहे. या काळात कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. महत्त्वाचे निर्णय थोडा वेळ थांबवणं चांगलं राहील. जमिनी, घर किंवा वाहनाशी संबंधित काही मोठं प्रकरण घडू शकतं.

कुंभ राशी (Aquarius Horoscope)

कुंभ राशीच्या लोकांसाठी मंगळाचं गोचर अशुभ ठरू शकतं. या काळात तुम्हाला मानसिक तणाव जाणवू शकतो. विद्यार्थ्यांचं अभ्यासात लक्ष लागणार नाही. प्रेमसंबंधात गैरसमज निर्माण होऊ शकतात. खर्च अचानक वाढू शकतात, ज्यामुळे बजेट बिघडू शकते. मुलांशी संबंधित काही चिंता उद्भवू शकते. या काळात शेअर बाजार किंवा सट्टा यांसारख्या जोखमीच्या गोष्टींपासून दूर राहा.

मीन राशी (Pisces Horoscope)

मंगळाचं गोचर मीन राशीच्या लोकांसाठी काही तणावाची परिस्थिती घेऊन येऊ शकतो. या काळात तुम्ही तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवायला हवं, कारण तुमचे शब्द एखाद्या जवळच्या व्यक्तीला दुखावू शकतात. घरात शांतता बिघडू शकते किंवा गैरसमज होऊ शकतात. खर्च वाढतील आणि आर्थिक बजेट बिघडू शकतं. जुना व्यवहार किंवा पैशांशी संबंधित वाद उद्भवू शकतो. या काळात संयम आणि शहाणपणाने वागणं गरजेचं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)