Mangal Gochar on 23 September: २३ सप्टेंबरला राहूच्या स्वाती नक्षत्रात मंगळ ग्रहाचं गोचर होणार आहे. यामुळे ३ राशीच्या लोकांचं नशीब उजळेल. या मंगळ गोचराचा शुभ प्रभाव कोणत्या ३ राशीच्या लोकांवर होणार आहे ते जाणून घेऊ या…

स्वाती नक्षत्रात मंगळाचे गोचर

मंगळवार, २३ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ९ वाजून ०८ मिनिटांनी वाजता मंगळ ग्रह स्वाती नक्षत्रात प्रवेश करेल. स्वाती नक्षत्रावर छाया ग्रह राहूचे राज्य आहे. या मंगळाच्या संक्रमणाचे परिणाम विशेषतः तीव्र असतील.

शौर्य, रक्त आणि ताकदीचा ग्रह मंगळाचा हा नक्षत्र गोचर काही राशीच्या लोकांसाठी खूप शुभ ठरणार आहे. धन-संपत्तीत मोठी वाढ होऊ शकते आणि मन आनंदी राहील. चला तर मग जाणून घेऊया या ३ भाग्यवान राशी कोणत्या आहेत.

सिंह राशी (Leo Horoscope)

सिंह राशीच्या लोकांना मंगळाच्या गोचरामुळे शत्रूंवर विजय मिळू शकतो. या काळात ते कोणतेही काम पूर्ण ताकदीने करतील. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात चमक येईल. आर्थिक स्थिती सुधारेल आणि कुटुंबासोबतचे संबंध चांगले होतील. आत्मविश्वास वाढेल आणि अडकलेली कामे किंवा योजना पुन्हा सुरू होतील. खूप दिवसांपासूनची अपुरी इच्छा पूर्ण होईल.

कन्या राशी (Virgo Horoscope)

मंगळ स्वाती नक्षत्रात गोचर केल्यामुळे कन्या राशीच्या लोकांना अनेक फायदे मिळतील. आर्थिक स्थिती मजबूत होईल. करिअरमध्ये नवी प्रगती साधता येईल. आत्मविश्वास वाढेल आणि वैवाहिक जीवनातील तणाव कमी होऊ शकतो. या काळात नवा व्यवसाय सुरू करण्यासाठी पाऊल उचलता येईल. आरोग्य सुधारण्यासाठीही मार्ग मिळतील.

धनु राशी (Sagittarius Horoscope)

धनु राशीच्या लोकांसाठी मंगळाचा राहूच्या नक्षत्रातील गोचर शुभ परिणाम देऊ शकतो. नवी गाडी किंवा नवी मालमत्ता खरेदी करता येईल. जोडीदारासोबतचे संबंध सुधारतील. प्रेमात जवळीक वाढेल. ऑफिसमध्ये कामाचे कौतुक होईल. कार्यक्षेत्रात सहकाऱ्यांचा चांगला पाठिंबा मिळेल. समाजात मान-सन्मान मिळेल. पैसे कमावण्यासाठी अनेक संधी मिळतील.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)