Mars Transit In Vruschik Rashi 2025: ज्योतिषशास्त्रानुसार मंगळाला साहस, पराक्रम, शौर्य, क्रोध, भूमी यांचा कारक ग्रह मानले जाते. त्यामुळे ज्या व्यक्तीच्या पत्रिकेत मंगळ शुभ स्थितीत असतो, असे लोक प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवण्यासाठी सक्षम असतात. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका निश्चित काळानंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो. अनेकदा याचा फायदा काही राशींच्या व्यक्तींना होतो. सध्या मंगळ तूळ राशीत विराजमान असून लवकरच तो पुढील राशीत गोचर करणार आहे.
पंचांगानुसार, मंगळ २७ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजून ४४ मिनिटांनी वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. वृश्चिक ही मंगळाचे स्वामीत्व असलेली रास आहे. त्यामुळे या राशीतील प्रवेशाने रुचक राजयोग निर्माण होईल. हा राजयोग ५ राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत अनुकूल सिद्ध होईल.
मंगळाचे राशी परिवर्तन देणार प्रचंड यश
मिथुन (Mesh Rashi)
मंगळाचे राशी परिवर्तन प्रवेश मिथुन राशीसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील.
वृश्चिक (Vruschik Rashi)
मंगळाचे राशी परिवर्तन वृश्चिक राशीसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. आर्थिक समस्या दूर होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल.
कन्या (Singh Rashi)
कन्या राशीच्या व्यक्तींसाठी मंगळाचे राशी परिवर्तन खूप लाभदायी सिद्ध होईल. हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक सिद्ध होईल. मानसिक तणावातून मुक्त व्हाल. वैवाहिक जीवन सुखमय असेल. आत्मविश्वासात वाढ होईल. आनंदी वार्ता कानी पडतील. समाजात मानसन्मान वाढेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील.
मकर (Makar Rashi)
मकर राशीच्या लोकांसाठी मंगळाचे राशी परिवर्तन अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. हा काळ तुमच्या आयुष्यातील सुवर्णकाळ ठरू शकतो. करिअरमध्ये भरपूर यश मिळेल. आरोग्य चांगले राहील व आर्थिक परिस्थितीदेखील सुधारण्यास मदत होईल. बँक बॅलन्समध्ये झपाट्याने वाढ होईल. कुटुंबात शुभकार्ये होतील.
मीन (Meen Rashi)
मीन राशीच्या व्यक्तींना मंगळाचे राशी परिवर्तन प्रचंड यश देण्यास सहाय्यक ठरेल. तुमच्या आयुष्यातील सुखाच्या क्षणांना सुरूवात होईल. अचानक धनलाभ होईल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. गुंतवणूक करणे फायदेशीर असेल. भाग्याची पुरेपुर साथ मिळेल. कोणत्याही वादविवादात पडण्यापूर्वी दहा वेळा विचार करा.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)