Malika Rajyog 2025: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ सुमारे ४५ दिवसांनी एक नवी रास बदलतो. त्यामुळे १२ राशींवर त्याचा मोठ्या प्रमाणात प्रभाव पडतो. ज्योतिषशास्त्रात मंगळाला भूमिपुत्र आणि धैर्य-आत्मविश्वासाचा कारक मानले जाते. त्यामुळे मंगळाच्या स्थितीत बदल झाल्यावर या गोष्टींवर परिणाम दिसून येतो.

२८ जुलै रोजी मंगळाने कन्या राशीत प्रवेश केला आहे. त्यामुळे ‘मालिका राजयोग’ तयार होत आहे. या योगामुळे १२ राशींमधील तीन राशींच्या लोकांना विशेष फायदा होण्याची शक्यता आहे. चला तर मग, पाहूया कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी.

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, मालिका योग म्हणजे एक माळ तयार होणे. जसे मण्यांची माळ असते, त्यामध्ये सगळे मणी एकमेकांशी जोडलेले असतात, त्याचप्रमाणे या योगात प्रत्येक घरात सलग ग्रह असतात. अशा प्रकारे जेव्हा प्रत्येक भावात सलग ग्रह असतात, तेव्हा हा योग तयार होतो आणि त्याचा चांगला परिणाम होतो. या योगामुळे सर्व ग्रहांना एकमेकांपासून बळ मिळते. या वेळी गुरू आणि शुक्र मिथुन राशीत, सूर्य आणि बुध कर्क राशीत, केतू सिंह राशीत आणि मंगळ कन्या राशीत आहे.

कर्क राशी (Cancer Horoscope)

मालिका योग कर्क राशीच्या लोकांसाठी खूपच शुभ ठरू शकतो. या राशीच्या लग्न भावात बुध व सूर्य, बाराव्या भावात गुरू व शुक्र, तिसऱ्या भावात मंगळ आणि दुसऱ्या भावात केतू विराजमान असतील. त्यामुळे या राशीच्या लोकांना अनेक क्षेत्रांत फायदा होऊ शकतो.

आर्थिक परिस्थिती चांगली राहील. खूप काळापासून असलेल्या अडचणी दूर होऊ शकतात. कामामुळे काही प्रवास करावे लागू शकतात आणि त्यातून फायदा होण्याची शक्यता आहे. जुने अडकलेले काम पूर्ण होतील. मुलांकडून चांगले परिणाम मिळू शकतात. प्रेमसंबंधही चांगले राहतील. शत्रूंवर विजय मिळू शकतो. काही आनंददायक बातमी मिळू शकते.

तूळ राशी (Libra Horoscope)

मालिका योग तूळ राशीच्या लोकांसाठीही फायदेशीर ठरू शकतो. या राशीचे लोक अध्यात्माकडे अधिक आकर्षित होऊ शकतात. त्यामुळे ते अनेक धार्मिक प्रवास करू शकतात. द्वादश भावात मंगळ असणे फारसे शुभ मानले जात नाही; पण इतर ग्रहांची स्थिती अनुकूल असल्यामुळे आर्थिक आणि कौटुंबिक बाबतीत यश मिळू शकते.

परदेशाशी संबंधित कामांमध्येही चांगले यश मिळू शकते. आरोग्य चांगले राहील. मुलांकडून एखादी चांगली बातमी मिळू शकते. सरकारी किंवा प्रशासनाशी संबंधित कामांमध्ये यश मिळू शकते. पद आणि प्रतिष्ठा वाढण्याचे योग आहेत. वडिलांशी चांगले संबंध राहतील. बहुतेक कामांमध्ये तुम्हाला यश मिळू शकते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वृश्चिक राशी (Scorpio Horoscope)

मालिका योग वृश्चिक राशीच्या लोकांसाठीही अनुकूल ठरू शकतो. या काळात त्यांचे उत्पन्न वेगाने वाढू शकते. समाजात मान-सन्मान वाढू शकतो. कोर्ट-कचेरीशी संबंधित प्रकरणांमध्ये यश मिळू शकते.

नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ खूप खास ठरू शकतो. त्यांनी केलेल्या मेहनतीचे फळ मिळू शकते. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सहकार्य मिळू शकते, ज्यामुळे फायदा होईल. भौतिक सुख-सुविधा मिळू शकतात. आयुष्यात सुख आणि शांतता टिकून राहील.