Mangal Gochar: ज्योतिषशास्त्रात मंगळ ग्रहाला क्रोध, मालमत्ता व धैर्य यांचा कारक मानले जाते. म्हणून जेव्हा मंगळ ग्रहाची चाल बदलते, तेव्हा या क्षेत्रांवर विशेष परिणाम होतो.

आता सांगायचं झालं तर, येत्या ऑगस्ट महिन्यात मंगळ ग्रह कन्या राशीत प्रवेश करणार आहे. कन्या राशीचा स्वामी बुध आहे. अशा स्थितीत तीन राशींच्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होण्याची आणि करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे.

चला, तर मग पाहूया या तीन नशीबवान राशी कोणत्या आहेत…

धनु राशी (Sagittarius Horoscope)

धनु राशीच्या लोकांसाठी मंगळ देवांचा गोचर शुभ ठरू शकतो. कारण- मंगळ ग्रह या राशीच्या कर्म भावात प्रवास करणार आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला कामधंद्यात यश मिळू शकतं.

तसेच नोकरी करणाऱ्या लोकांच्या पद आणि प्रतिष्ठेत वाढ होईल. काही लोकांना बढती मिळू शकते किंवा नवीन नोकरीची संधी मिळू शकते. व्यापाऱ्यांनादेखील फायदेशीर व्यवहार आणि व्यवसाय वाढवण्याची चांगली संधी मिळू शकते.

सिंह राशी (Leo Horoscope)

मंगळ ग्रहाचं राशी परिवर्तन सिंह राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतं. कारण- मंगळ ग्रह या राशीच्या गोचर कुंडलीत दुसऱ्या भावात प्रवास करणार आहे. त्यामुळे या काळात अचानक पैसे मिळण्याची शक्यता आहे.

धनलाभाचे चांगले योग येतील आणि तुम्ही नवीन व्यवसायातही प्रयत्न करू शकता. त्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. कारण- पैशांचे नवीन मार्ग मिळू शकतात. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याचीही शक्यता आहे. या काळात पैसे साठवण्याची संधीही मिळेल. त्याशिवाय समाजात मान-सन्मानही मिळू शकतो.

मीन राशी (Pisces Horoscope)

मंगळ ग्रह तुमच्या गोचरानुसार वैवाहिक स्थानी भ्रमण करणार आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला जोडीदाराची साथ आणि पाठिंबा मिळेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तसेच या काळात तुमच्या जोडीदाराची प्रगती होण्याची शक्यता आहे. मीन राशीचा स्वामी गुरू ग्रह आहे आणि मंगळ ग्रहाचा गुरू ग्रहाशी मैत्रीपूर्ण संबंध आहे. त्यामुळे जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करीत असाल, तर हा काळ तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. या काळात समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल आणि तुमची नेतृत्व क्षमता सुधारेल, ज्यामुळे लोक तुमच्या निर्णयांचा आदर करतील.