Mars Transit on 23 September: वैदिक ज्योतिषानुसार ग्रह वेळोवेळी राशी आणि नक्षत्र बदलत असतात, ज्याचा परिणाम माणसाच्या आयुष्यावर आणि देश-विदेशावर दिसून येतो. २३ सप्टेंबर रोजी मंगळ देव राहूच्या स्वाती नक्षत्रात प्रवेश करतील. या दरम्यान मंगळ तूळ राशीत असतील. अशा वेळी काही राशींना मोठा फायदा होऊ शकतो. तसेच या काळात धन-संपत्तीमध्ये खूप वाढ होऊ शकते. याशिवाय देश-विदेश प्रवासाची संधीही मिळू शकते. चला तर मग पाहूया, कोणत्या आहेत या भाग्यवान राशी…

वृषभ राशी (Taurus Horoscope)

वृषभ राशीसाठी मंगळ ग्रहाचे नक्षत्र बदलणे सकारात्मक ठरू शकते. त्यामुळे या काळात तुम्हाला कामात विशेष प्रगती मिळू शकते. तसेच पैसे येण्यासाठी नवीन मार्ग तयार होतील. विद्यार्थ्यांना येत्या दिवसांत एखाद्या प्रभावशाली व्यक्तीची साथ मिळेल, जी त्यांच्या करिअरला योग्य दिशा देईल. व्यापारी आणि दुकानदारांना जुन्या कर्जापासून मुक्ती मिळू शकते. तसेच या काळात व्यापार्‍यांना नवीन ऑर्डर मिळू शकतात, ज्यामुळे आर्थिक फायदा होईल.

कर्क राशी (Cancer Horoscope)

मंगळ ग्रहाचे नक्षत्र परिवर्तन कर्क राशीच्या लोकांसाठी शुभ फलदायी ठरू शकते. या काळात तुमच्या उत्पन्नात वाढ होईल. करिअरची चिंता कमी होईल, कारण एखाद्या प्रभावशाली व्यक्तीची साथ मिळेल. ज्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे, त्यांचा नफा वाढेल. घरात सुख आणि समृद्धी येईल. तुमच्या व्यक्तिमत्त्वात सुधारणा होईल. ज्येष्ठ लोकांना जुन्या गुंतवणुकीतून अचानक खूप फायदा होईल. या काळात तुमच्या योजना यशस्वी होतील. तसेच पैशांची बचत करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल.

कुंभ राशी (Aquarius Horoscope)

तुमच्यासाठी मंगळ ग्रहाचे नक्षत्र बदलणे फायद्याचे ठरू शकते. या काळात तुम्ही नवीन वाहन किंवा प्रॉपर्टी खरेदी करू शकता. नोकरी करणाऱ्या लोकांना मान-सन्मान आणि नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. व्यापाऱ्यांना नवीन प्रोजेक्ट्समध्ये यश मिळेल. नेतृत्व करण्याची क्षमता आणि मॅनेजमेंट स्किल चांगली राहील. यासोबतच तुमच्या धैर्य आणि पराक्रमातही वाढ होईल. जर जुनी प्रॉपर्टी संबंधित घरामध्ये काही वाद चालू असेल, तर त्याचे समाधान होईल. व्यापाऱ्यांचे भाऊंसोबतचे नाते मजबूत होईल.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)