Mangal-Ketu Yuti 2025: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी राशी किंवा नक्षत्रबदल करतात आणि त्यामुळे शुभ किंवा अशुभ योग निर्माण होतात. त्याचा परिणाम अनेक राशींच्या लोकांवर दिसून येतो. ७ जून रोजी मंगळ आणि केतूची युती निर्माण झाली होती ज्याचा अशुभ प्रभाव काही राशींवर पाहायला मिळाला होता. परंतु आता २८ जुलै रोजी ही युती समाप्त झाली असून त्यानंतरचा काळ काही राशीच्या व्यक्तींसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल.

‘या’ राशींचे नशीब चमकणार

कर्क (Kark Rashi)

कर्क राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ खूप फायद्याचा ठरेल. या काळात तुमची अनेक स्वप्ने पूर्ण होतील. कर्ज कमी होण्यास मदत होईल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील.वैवाहिक जीवन सुखमय राहील. आयुष्यातीस संकटं दूर होण्यास मदत होईल. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. नोकरी करणाऱ्यांना नवी संधी मिळेल. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. तसेच अडकलेले पैसे मिळतील.

सिंह (Singh Rashi)

सिंह राशीच्या व्यक्तींसाठीही अनेक सकारात्मक फायदे होतील. मंगळ-केतूचा अशुभ संयोग तुमच्या राशीच्या लग्न भावावर होता. आता तो संपणार असून त्याच्या शुभ प्रभावाने तुमच्या कामातील अडथळे दूर होतील. नवे लोक, नवे छंद यांच्याशी जोडले जाल. शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम असेल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल. तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. मुलांकडून आनंदी वार्ता मिळतील. कुटुंबातही आनंदी आनंद असेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तूळ (Tula Rashi)

तूळ राशीदेखील हा काळ अत्यंत लाभकारी ठरेल. या काळात तुमच्या आयुष्यात आनंदी आनंद येईल.करिअरमध्ये चांगली प्रगती होईल. या काळात तुम्हाला अनेक आकस्मिक धनलाभ होतील. प्रत्येक कामात कुटुंबीयांची साथ मिळेल.स्पर्धा परीक्षेत यश मिळेल. तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील. नात्यातील दूरावा दूर होईल. मेहनतीचे कौतुक होईल. या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)