Mangal Ketu Yuti 2025: गेल्या दीड महिन्यापासून मंगळ आणि केतूने एक भीषण युती केली आहे, ज्याचा त्रास संपूर्ण देश आणि जगाला होत आहे. पण आता परिस्थिती आणखी धोकादायक झाली आहे.
उग्र ग्रह मंगळ आणि केतू खूपच अशुभ स्थितीत आहेत. केतू सिंह राशीत आहे आणि मंगळही सिंह राशीत आहे. मंगळ-केतूच्या युतीमुळे युद्ध, हिंसा, विमान अपघात, भूस्खलन यासारखे प्रसंग संपूर्ण जगाने अनुभवले. पण आता पुढचे ७ दिवस आणखी धोकादायक ठरणार आहेत.
२८ जुलैपर्यंतचा काळ संकटमय
खरं तर, २१ जुलै ते २८ जुलै या काळात मंगळ केतूच्या वरून जातो आहे, ही आणखी धोकादायक स्थिती आहे. त्यामुळे या काळात जास्त सावध राहणं आवश्यक आहे. २८ जुलैला मंगळ कन्या राशीत प्रवेश करेल, तेव्हा ही युती तुटेल आणि लोकांना थोडा आराम मिळेल.
शनीही क्रूर
मंगळ-केतू शनीसोबत मिळून षडाष्टक योगही तयार करत आहेत. त्यामुळे ही युती तीव्र परिणाम देत आहे. क्रूर ग्रह शनी सध्या वक्री स्थितीत आहे, त्यामुळे त्याचा प्रभाव थोडा कमी झाला आहे.
‘या’ ४ राशींवर वाईट परिणाम (Aries, Leo, Virgo, Pisces)
मंगळ-केतूची अशुभ युती या ४ राशींसाठी खासकरून वाईट मानली जाते. या राशी आहेत मेष, सिंह, कन्या आणि मीन. २८ जुलैपर्यंतचा काळ या लोकांच्या करिअरवर खराब परिणाम करू शकतो. त्यामुळे आपलं काम प्रामाणिकपणे करा.
करिअरवर संकट, आर्थिक तोटा
ज्यांच्या कुंडलीत मंगळ, राहू आणि केतूची स्थिती अशुभ आहे, त्यांनी खास काळजी घ्यावी. अशा लोकांच्या वैवाहिक जीवनात समस्या येऊ शकतात. कोणासोबत वाद होऊ शकतो. आर्थिक तोटा होऊ शकतो. करिअरवर संकट येऊ शकतं.
या काळात प्रवास टाळा, वाहन काळजीपूर्वक चालवा. कारण केतू धर्म-कर्माचे कारक आहेत, त्यामुळे धार्मिक ठिकाणी गोंधळ किंवा आपत्ती येण्याची शक्यता आहे. तसेच या काळात मोठे निर्णय घेऊ नयेत.