Surya Mangal Aditya Mangal Rajyog: ज्योतिषशास्त्रानुसार, १४ जानेवारी २०२६ रोजी ग्रहांचा राजा सूर्य मकर राशीत संक्रमण करेल. या दिवशी मकर संक्रांत साजरी केली जाईल. फक्त दोन दिवसांनी म्हणजेच १६ जानेवारी २०२६ रोजी ग्रहांचा सेनापती मंगळ मकर राशीत संक्रमण करेल. अशाप्रकारे सूर्य आणि मंगळ शनीच्या राशीत अर्थात मकर राशी युती करतील. त्यामुळे आदित्य मंगल योग निर्माण होईल. ज्योतिषशास्त्रात, आदित्य मंगल योगाची निर्मिती अत्यंत शुभ मानली जाते. शिवाय २०२६च्या सुरूवातीला शनीच्या राशीत मकर राशीत आदित्य मंगल योगाची निर्मिती या चार राशींसाठी अत्यंत फलदायी ठरू शकते. तर मग जाणून घेऊ कोणत्या आहेत या चार राशी…

मेष राशी

मेष राशीच्या लोकांना शनीच्या साडेसातीच्या प्रकोपाचा सामना करावा लागत आहे. मात्र, २०२६च्या सुरूवातीला आदित्य मंगल राज योगाची निर्मिती त्यांना फायदेशीर ठरेल. काम चांगले होईल, व्यवसायात तेजी येईल, आर्थिक ताकद वाढेल आण आत्मविश्वास वाढेल.

वृषभ राशी

आदित्य मंगल योगामुळे वृषभ राशीला सर्वांगीण लाभ होतील. तुमच्या नोकरी आणि व्यवसायात प्रगती शक्य होईल. नवीन स्त्रोतांमार्फत पैसे येतील, त्यामुळे भविष्यात फायदा होईल. जुन्या गुंतवणुकीतून नफा मिळेल. तुमचा बँक बॅलन्स वाढेल. तुम्हाला आराम वाटेल. लग्न जुळण्याची शक्यता आहे.

तूळ राशी

मंगळ आणि सूर्याच्या युतीमुळे तूळ राशीला सकारात्मक परिणाम मिळतील भौतिक सुखसोयी वाढतील. तुम्ही नवीन घर, मालमत्ता किंवा वाहन खरेदी करू शकता. तुमच्या कुटुंबात आनंद राहील, मानसिक संतुलन राखले जाईल आणि गुंतवणूक केल्यास नफा मिळेल.

मकर राशी

मकर राशीत सूर्य आणि मंगळाच्या युतीमुळे आदित्य मंगल राजयोग निर्माण होईल. यामुळे तुम्हाला महत्त्वपूर्ण फायदे होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुम्ही नवीन प्रकल्प किंवा व्यवसाय देखील सुरू करू शकता. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. अविवाहित व्यक्तींसाठी विवाह जुळवता येतील.