Mars Transit 2025: ज्योतिषशास्त्रानुसार मंगळाला साहस, पराक्रम, शौर्य, क्रोध, भूमी यांचा कारक ग्रह मानले जाते. त्यामुळे ज्या व्यक्तीच्या पत्रिकेत मंगळ शुभ स्थितीत असतो, असे लोक प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवण्यासाठी सक्षम असतात. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका निश्चित काळानंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो. अनेकदा याचा फायदा काही राशींच्या व्यक्तींना होतो. सध्या मंगळ कन्या राशीत विराजमान असून उत्तराफाल्गुनी नक्षत्रामध्ये विराजमान आहे.
पंचांगानुसार, मंगळ १३ ऑगस्ट रोजी जवळपास रात्री १० वाजून ४४ मिनिटांनी हस्त नक्षत्रामध्ये प्रवेश करेल. हस्त नक्षत्राचा स्वामी चंद्र आहे. या नक्षत्रामध्ये मंगळ ३ सप्टेंबरपर्यंत विराजमान असेल. तोपर्यंतचा काळ काही राशाीच्या व्यक्तींसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल.
मंगळाचे नक्षत्र परिवर्तन करणार मालमाल
मेष (Mesh Rashi)
चंद्राचे नक्षत्र परिवर्तन प्रवेश मेष राशीसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील.
वृश्चिक (Vruschik Rashi)
चंद्राचे नक्षत्र परिवर्तन वृश्चिक राशीसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. आर्थिक समस्या दूर होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल.
सिंह (Singh Rashi)
सिंह राशीच्या व्यक्तींसाठी चंद्राचे नक्षत्र परिवर्तन खूप लाभदायी सिद्ध होईल. हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक सिद्ध होईल. मानसिक तणावातून मुक्त व्हाल. वैवाहिक जीवन सुखमय असेल. आत्मविश्वासात वाढ होईल. आनंदी वार्ता कानी पडतील. समाजात मानसन्मान वाढेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कुटुंबात शुभकार्ये होतील.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)