Mars Nakshatra Transit 2025: ज्योतिषशास्त्रानुसार, मंगळ ग्रहाला ऊर्जा, पराक्रम, आत्मविश्वास आणि नेतृत्वाचे प्रतीक मानले जाते.  त्यामुळे ज्या व्यक्तीच्या पत्रिकेत मंगळ शुभ स्थितीत असतो, असे लोक प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवण्यासाठी सक्षम असतात. सध्या मंगळ ग्रह सिंह राशीत गोचर करत आहे. ७ जून २०२५ रोजी रात्री २:२८ वाजता मंगळाने सिंह राशीत प्रवेश केला असून, मंगळ २८ जुलै २०२५ पर्यंत तेथेच राहणार आहे. मात्र विशेष बाब म्हणजे २३ जुलै रोजी मंगळ उत्तराफाल्गुनी नक्षत्रात प्रवेश करणार आहे, ज्याचा प्रभाव पाच राशींवर जबरदस्त दिसून येणार आहे.

या नक्षत्राचा अधिपती सूर्य असून हे नक्षत्र मान-सन्मान, सामाजिक प्रतिष्ठा, सर्जनशीलता आणि दीर्घकालीन यशाचे प्रतीक मानले जाते. मंगळ आणि सूर्य यांच्यातील मैत्रीमुळे या गोचराचा सकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतो. पाहुया कोणत्या पाच राशींना मंगळाच्या या नक्षत्र बदलाचा लाभ मिळण्याची शक्यता आहे…

मंगळाच्या कृपेने ‘या’ ५ राशींचं नशिब फळफळणार!

मिथुन

मंगळाचा गोचर तिसऱ्या भावात होत असल्यामुळे व्यावसायिक जीवनात यश, नवीन संधी आणि आर्थिक फायदा मिळण्याचे संकेत आहेत. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या नोकरदारांना या काळात मोठ्या कंपनीकडून जॉबच्या संधी मिळू शकतात. तसेच सेल्स, मार्केटिंग किंवा मीडिया क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी हा काळ फायदेशीर ठरु शकतो.

सिंह

प्रथम भावात मंगळ असल्यामुळे सिंह राशीच्या लोकांना मोठा लाभ होऊ शकतो. गुंतवणुकीसाठी योग्य काळ आहे. उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी हा काळ चांगला राहणार आहे. या काळात तुमच्या पदोन्नतीत वाढ होण्याची शक्यता आहे. व्यवसायाच्या क्षेत्रातही तुम्हाला मोठा नफा होऊ शकतो. वडिलोपार्जित मालमत्तेतून लाभ मिळण्याची शक्यता आहे.

कन्या

बाराव्या भावात मंगळ असल्यामुळे जीवनात बरेच बदल घडून येऊ शकतात. संशोधन क्षेत्रात यश आणि अचानक धनलाभाचे संकेतही आहेत. प्रवासाचे योग निर्माण होतील. करिअरच्या क्षेत्रात बरेच फायदे मिळण्याची शक्यता आहे.  या काळात तुम्हाला गुंतवणुकीच्या चांगल्या संधी देखील मिळू शकतात. अचानक मोठा धनलाभ होऊ शकतो. या काळात पैसे वाचवण्यात यशस्वी व्हाल. 

तूळ

अकराव्या भावात मंगळ असल्याने तूळ राशीच्या लोकांना नोकरी, व्यवसाय आणि सामाजिक संबंधांत प्रगती दिसून येईल. उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होऊ शकतात. जुन्या गुंतवणूकीतून लाभ होऊ शकतो. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ अनुकूल आहे. कामात आणि व्यवसायात विशेष प्रगती मिळू शकते. तसेच तुमचे प्रेम जीवन खूप चांगले होईल.  

वृश्चिक

दशम भावात मंगळ असल्यामुळे या राशीच्या लोकांची प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ शकणार आहेत. करिअरमध्ये जबरदस्त संधी, प्रॉपर्टी व तांत्रिक क्षेत्रात यश प्राप्त होऊ शकतो. मान-सन्मानात भर पडेल. उत्पन्नाचे अनेक स्रोत उघडू शकतात. बऱ्याच काळापासून सुरू असलेल्या आर्थिक संकटातून दिलासा मिळू शकेल. या काळात वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)