Mangal Planet Transit: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह विशिष्ट कालावधीत आपली राशी बदलतो. ग्रहांचा हा बदल काहींसाठी सकारात्मक तर काहींसाठी सकारात्मक आहे. मंगळाने २७ जून रोजी मेष राशीत प्रवेश केला आहे. तसेच ते १० ऑगस्टपर्यंत याच राशीत राहणार आहेत. त्यामुळे मंगळाचे हे राशी परिवर्तन सर्व राशींवर परिणाम करेल. पण ३ राशी आहेत, ज्यांच्यासाठी हे राशी परिवर्तन फायदेशीर ठरू शकते. चला जाणून घेऊया या कोणत्या राशी आहेत…

मिथुन: मिथुन राशीतील लोकांना मंगळाचे राशी परिवर्तन होताच चांगला लाभ मिळू शकतो. कारण मंगळ तुमच्या राशीतून अकराव्या घरात प्रवेश करत आहे. ज्योतिष शास्त्रानुसार ज्याला उत्पन्न आणि लाभाचे स्थान मानले जाते. त्यामुळे या काळात तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच व्यवसायात चांगला फायदा होऊ शकतो. तुमची आर्थिक बाजू देखील यावेळी मजबूत होईल. यासोबतच तुमची कार्यशैली देखील यावेळी दिसून येईल ज्यामुळे तुमचं कामाच्या ठिकाणी होऊ शकतं. तसेच वरिष्ठांची मदत मिळू शकते. दुसरीकडे मंगळ तुमच्या सातव्या घराचा स्वामी आहे. त्यामुळे यावेळी तुम्हाला तुमच्या जीवनसाथीची साथ मिळू शकते. यावेळी तुम्ही पन्ना घालू शकता. जे तुमच्यासाठी लकी ठरू शकतात.

आणखी वाचा : संसप्तक योगमुळे या ३ राशींचे भाग्य उजळू शकते, सूर्य आणि शनिदेवाची असेल विशेष कृपा

कर्क: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, मंगळाचे राशी परिवर्तन होताच तुमच्या जीवनात बदल होऊ शकतो. कारण तुमच्या राशीतून मंगळ दशम भावात प्रवेश करत आहे, ज्याला नोकरी आणि कामाचे घर मानलं जातं. त्यामुळे या काळात तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. तसेच जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला बढती आणि वेतनवाढ मिळू शकते. यावेळी तुमच्यासाठी नवीन व्यावसायिक संबंध बनू शकतात. त्याचबरोबर व्यवसायाच्या विस्तारासाठी हा काळ उत्तम आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला मालमत्ता आणि वाहन व्यवहारातही चांगला नफा होऊ शकतो. आपण व्यवसायातील महत्त्वपूर्ण करार देखील अंतिम करू शकता. मात्र, तुमच्या राशीचा स्वामी चंद्र देव आणि बुध ग्रह यांचा संबंध कसा आहे हे येथे पाहणे महत्त्वाचे आहे. तुम्ही मोती घालू शकता, जे तुमच्यासाठी भाग्यवान रत्न ठरू शकते.

आणखी वाचा : गुरू ग्रह १०८ दिवस वक्री राहील, या ३ राशींच्या व्यक्तींना होणार धनलाभ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सिंह: मंगळाचे राशी परिवर्तन तुमच्यासाठी खूप शुभ ठरू शकते. कारण तुमच्या राशीतून मंगळाने नवव्या स्थानात भ्रमण केले आहे. ज्याला नशीब आणि परदेशाचे घर मानले जाते. त्यामुळे यावेळी तुम्हाला प्रत्येक गोष्टीत नशीबाची साथ मिळेल. यासोबतच रखडलेली कामेही मार्गी लागणार आहेत. त्याचबरोबर सरकारी टेंडरशी संबंधित काम करणाऱ्यांसाठीही काळ चांगला सिद्ध होऊ शकतो. आपण व्यवसायाच्या संदर्भात प्रवास करू शकता. जे तुम्हाला भविष्यात लाभाचे संकेत आहेत. स्पर्धात्मक विद्यार्थ्यांना यावेळी नशीबाची पूर्ण साथ मिळेल. याचा अर्थ ते कोणत्याही परीक्षेत यशस्वी होऊ शकतात, इथे आपल्या कुंडलीत सूर्याचा मंगळाशी कसा संबंध आहे हे पाहणे महत्त्वाचे आहे. या काळात तुम्ही नीलमणी घालू शकता. जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.