Mangal Transit In Aries 2022: शंकराच्या उपासनेच्या दृष्टीने तसंच ग्रह आणि नक्षत्रांच्या स्थितीच्या दृष्टीने हा महिना विशेष आहे. बुध, सूर्य आणि शुक्र यांनी राशी बदलली आहे. ज्योतिष शास्त्रात प्रत्येक ग्रहाच्या राशी बदलाची वेळ सांगितली आहे. मंगळ देखील ठराविक काळानंतर राशी बदलत राहतो. वैदिक ज्योतिषात मंगळ हा भूमी, विवाह, धैर्य यांचा कारक मानला जातो. मंगळ सध्या मेष राशीत बसला आहे.

मंगळाने २७ जून रोजी मेष राशीत प्रवेश केला होता आणि १० ऑगस्टपर्यंत या राशीत राहील. हिंदू कॅलेंडरनुसार, हा महिना संपण्यापूर्वी मंगळाच्या राशीत बदल होईल. तर मंगळाचे राशी परिवर्तन १० ऑगस्टला होईल. या काळात मंगळ काही राशीच्या लोकांसाठी खूप शुभ राहील. जाणून घ्या कोणत्या भाग्यशाली राशी आहेत ज्यांच्यासाठी जुलै आणि ऑगस्ट २०२२ चे पहिले १० दिवस खूप चांगले जाणार आहेत.

आणखी वाचा : Nag Panchami 2022: कधी आहे यंदाची नागपंचमी? जाणून घ्या पूजेचा शुभमुहूर्त, पूजा विधी आणि महत्व

मिथुन राशीसह २ राशींवर मंगळ कृपा करेल
मिथुन राशीच्या लोकांसाठी मंगळाचे राशी परिवर्तन चांगले आहे. आगामी काळात मिथुन राशीच्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होईल. व्यावसायिकांना धनलाभ होईल. आर्थिक स्थिती चांगली राहील. वाढलेले खर्च तुम्हाला त्रास देणार नाहीत, तरीही बजेट बनवून खर्च करा. काम चांगले होईल. जोडीदाराचे सहकार्य मिळेल.

कर्क राशीच्या लोकांसाठी मंगळ शुभ आहे
कर्क राशीच्या लोकांसाठी मेष राशीत मंगळाची उपस्थिती खूप फलदायी आहे. या काळात मंगळ राशीच्या लोकांसाठी भरपूर संपत्ती आणि करिअरमध्ये प्रगती करण्याचा मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न करेल. नवीन नोकरीची ऑफर येऊ शकते. यासह इच्छित ठिकाणी बदली करण्यासाठी नोकऱ्या बदलण्याची सर्व शक्यता आहे. पदोन्नती वाढही होऊ शकते. व्यापाऱ्यांचे जाळे वाढेल. प्रॉपर्टीशी संबंधित काम करणाऱ्यांसाठी काळ चांगला आहे.

आणखी वाचा : शनिदेवाचा वक्री अवस्थेत मकर राशीत प्रवेश, या राशींवर सुरू झाला धैय्याचा प्रकोप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सिंह राशीसाठी मंगळ शुभ आहे
सिंह राशीच्या लोकांनाही मंगळाचा लाभ होईल. भाग्य तुम्हाला साथ देईल. परदेशातून लाभ होईल. कामात यश मिळेल. आतापर्यंत रखडलेली कामे पूर्ण होतील. सरकारी क्षेत्राशी संबंधित कामात यश मिळेल. तुम्ही बिझनेस ट्रिपला जाऊ शकता. परीक्षा आणि मुलाखतीत यश मिळेल. एकूणच हा काळ चांगला जाईल.