Mars Transit 2025 Effects on Zodiac Signs: ऊर्जा, धैर्य, पराक्रम, जमीन व विवाह यांचे कारक असलेला मंगळ जुलैच्या शेवटी भ्रमण (गोचर) करणार आहे. या गोचरामुळे मंगळ दोन शत्रू ग्रहांची युती घडवेल, जी ५ राशींकरिता अशुभ ठरू शकते.
२८ जुलै रोजी मंगळ ग्रह गोचर करणार आहे. मंगळ सायंकाळी ७ वाजून ५८ मिनिटांनी कन्या राशीत प्रवेश करील. त्यामुळे मंगळ आणि बुधाची युती बनेल. ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ आणि बुध हे शत्रू ग्रह आहेत. त्यांची ही युती पाच राशींच्या करिअर, आरोग्य आणि आर्थिक स्थितीवर वाईट परिणाम करू शकते. चला तर मग पाहूया कोणत्या आहेत त्या पाच राशी.
मिथुन राशी (Gemini Horoscope)
मंगळाचे गोचर मिथुन राशीच्या लोकांना आर्थिक नुकसान देऊ शकते. खर्च वाढतील आणि तुम्ही फालतू गोष्टींवर पाण्यासारखा पैसा खर्च कराल. घरात वाद किंवा गैरसमज होऊ शकतो.
तूळ राशी (Libra Horoscope)
तूळ राशीच्या लोकांचे खर्च उत्पन्नापेक्षा जास्त होतील. आरोग्य बिघडू शकते आणि त्यामुळे खाण्यापिण्याची काळजी घ्या. तणाव जाणवेल. स्पर्धक जोरदार टक्कर देतील.
धनू राशी (Sagittarius Horoscope)
मंगळ-बुध युतीमुळे धनू राशीच्या लोकांना करिअरमध्ये अडचणी येऊ शकतात. लक्ष केंद्रित करून काम करा. ऑफिसमधील राजकारणापासून दूर राहा. मेहनतीचं फळ कमी मिळू शकतं.
मकर राशी (Capricorn Horoscope)
या काळात मकर राशीच्या लोकांनी प्रवास टाळावा. काळजीपूर्वक काम करा. दुखापत होण्याची शक्यता आहे. जर संयम ठेवला, तर हा काळ सहजतेने पार पडेल.
मीन राशी (Pisces Horoscope)
मीन राशीचे जे व्यापारी लोक भागीदारीत काम करतात, त्यांना नुकसान होऊ शकते किंवा भागीदारी संपुष्टात येऊ शकते. वैवाहिक जीवनातही समस्या निर्माण होऊ शकते. या काळात संयम आणि समजूतदारपणाने वागणे योग्य ठरेल.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)