वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा जेव्हा एखादा ग्रह राशी बदलतो किंवा इतर कोणत्याही ग्रहाशी युती करतो तेव्हा त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर होतो. ग्रहांचा सेनापती मंगळ देव २७ जून रोजी मेष राशीत प्रवेश करणार आहे. जिथे राहु ग्रह आधीच स्थित आहे. या दोन ग्रहांच्या युतीने अंगारक योग तयार होत आहे. जे ज्योतिषशास्त्रात शुभ मानले जात नाही. कारण मंगळ हा स्वतः अग्नी तत्वाचा प्रभाव असलेला ग्रह आहे. चला जाणून घेऊया हा योग बनल्यामुळे  कोणत्या राशींच्या व्यक्तींचे  अडचणी वाढू शकतात.

वृषभ : तुमच्या राशीतून १२ व्या घरात अंगारक योग तयार होत आहे. ज्याला नुकसान आणि खर्चाचे ठिकाण म्हणतात. त्यामुळे या काळात तुमचा खर्च वाढू शकतो. त्यामुळे तुमचे बजेट बिघडू शकते. यावेळी तुमचे भावंडांशी भांडण होऊ शकते. त्यामुळे बोलण्यात संयम ठेवा. यावेळी शत्रू तुमच्याविरुद्ध कोणतेही षडयंत्र करू शकतात. व्यवसायात यावेळी कोणतेही सौदे करणे टाळा, अन्यथा नुकसान होऊ शकते.

आणखी वाचा : ३० जूनपर्यंत ग्रहांच्या हालचालीत मोठा बदल, या ४ राशींचे नशीब चमकू शकते

सिंह : नवव्या घरात तुमच्या राशीसह अंगारक योग तयार होईल. जे भाग्य आणि परदेश प्रवासाचे ठिकाण मानले जाते. त्यामुळे यावेळी नशिबाची साथ मिळणार नाही. कोणताही मोठा करार अंतिम होईपर्यंत थांबू शकतो. तसंच जर तुम्ही परदेशात जाण्याचा विचार करत असाल तर आता काही कारणास्तव ते रद्द केले जाऊ शकते. त्याचबरोबर वाहन जपून चालवताना काळजी घ्या, अन्यथा अपघात होऊ शकतो. तसेच बाहेरचे अन्न खाणे टाळावे. अन्यथा मसालेदार आणि जंक फूडमुळे पचनाच्या इतर समस्या उद्भवू शकतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तूळ: तुमच्या गोचर कुंडलीतून पाचव्या भावात अंगारक योग तयार होईल. ज्याला उच्च शिक्षण आणि प्रेमविवाहाचे ठिकाण म्हटले जाते. त्यामुळे यावेळी तुम्हाला प्रेमप्रकरणात अपयशाचा सामना करावा लागू शकतो. तसेच उच्च शिक्षणात व्यत्यय येऊ शकतो. या काळात तुमची भाषा खराब होऊ शकते. कुटुंबात भांडणे आणि वाद होऊ शकतात. तसंच या काळात तुम्हाला कामाच्या ठिकाणी तुमच्या सहकर्मचाऱ्यांबद्दल आक्रमकता वाढून भांडण होऊ शकते.