Aries To Pisces Horoscope Today : ५ फेब्रुवारी २०२५ रोजीमाघ महिन्याच्या शुक्ल पक्षाची अष्टमी तिथी आहे. अष्टमी तिथी बुधवारी रात्री १२ वाजून ३६ मिनिटांपर्यंत राहील. शुक्ल योग रात्री ९ वाजून १९ मिनिटानीपर्यंत जुळून येणार आहे. तसेच भरणी नक्षत्र रात्री ८ वाजून ३३ मिनिटांपर्यंत जागृत असणार आहे . आज राहू काळ १२ वाजून ३० मिनिटांनी सुरु होईल ते १ वाजून ३० मिनिटांपर्यंत असणार आहे.

याशिवाय ५ फेब्रुवारीला भीष्माष्टमी तसेच दुर्गाष्टमी व्रत पाळण्यात येणार आहे. प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी ही मासिक दुर्गाष्टमी असते. मासिक दुर्गाष्टमीचा दिवस देवी दुर्गाला समर्पित करण्यात आला आहे. मासिक दुर्गाष्टमीच्या दिवशी, माता लक्ष्मीची पूजा केली जाते.तर आज १२ राशींना दिवस कसा जाईल हे आपण जाणून घेऊया

५ फेब्रुवारी पंचांग व राशिभविष्य:

मेष:- मानसिक स्थैर्य जपावे. घरातील वयस्कर मंडळींची काळजी घ्यावी. अधिकारी व्यक्तींची ओळख होईल. नवीन लोकांशी मैत्रीपूर्ण संबंध जोडले जातील. मनातील इच्छा पूर्ण होतील.

वृषभ:- जोडीदाराविषयीचे गैरसमज मनातून काढून टाकावेत. भागिदारीतून लाभ संभवतो. कामात चलबिचलता आड येऊ शकते. मौल्यवान वस्तु खरेदी केल्या जातील. वाहनविषयक कामे पार पडतील.

मिथुन:- वरिष्ठांचे धोरण लक्षात घ्यावे. आपला मान जपण्याचा प्रयत्न करावा. मनातील निराशा दूर सारण्याचा प्रयत्न करावा. काहीसा मानसिक ताण जाणवेल. कामातून आनंद शोधावा.

कर्क:- मुलांच्या आनंदात रमून जाल. नवीन विषयात रुची दाखवाल. करमणुकीचे कार्यक्रम पहायला जाल. भावंडांना मदत कराल. गुरुकृपेचा लाभ घ्यावा.

सिंह:- घरातील गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे. दिवसभर कामात गुंतून राहाल. टापटिपीकडे विशेष लक्ष द्याल. छुप्या शत्रूंचा विरोध मावळेल. जमिनीच्या कामात रस घ्याल.

कन्या:- जवळच्या प्रवासात काळजी घ्यावी. वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे. आरोग्यात सुधारणा होईल. हातातील कामे सुरळीत पार पडतील. वैवाहिक जीवनाला बहर येईल.

तूळ:- आवडी-निवडी बाबत दक्ष राहाल. भावंडांच्या समस्या जाणून घ्याव्यात. कौटुंबिक सौख्य उत्तम राहील. हातापायाला किरकोळ इजा संभवते. चुकीच्या मार्गाचा अवलंब करू नका.

वृश्चिक:- दिवस आपल्या मनाप्रमाणे घालवाल. तुमचा मान वाढेल. चारचौघात कौतुकास पात्र व्हाल. खर्चाला नवीन वाटा फुटू शकतात. कुटुंबात तुमचा दबदबा राहील.

धनू:- संयम राखणे गरजेचे ठरेल. घाईने कोणतेही काम करू नका. कौटुंबिक समस्यांकडे अधिक लक्ष द्यावे. वरिष्ठ तुमच्या कामावर खुश होतील. थोडे धाडस दाखवावे लागेल.

मकर:- संयम सोडून चालणार नाही. नवीन गोष्टींची जबाबदारी वाढू शकते. सामाजिक वादात पडू नये. धार्मिक ग्रंथांचे वाचन करावे. काही खर्च अचानक येवू शकतात.

कुंभ:- फार विचार करू नयेत. कामाचा ताण जाणवेल. व्यापारी वर्गाला चांगला लाभ संभवतो. वेळेचे महत्व लक्षात घ्यावे. योग्य नियोजनावर भर द्यावा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मीन:- तोंडात साखर ठेवून बोलाल. मैत्रीचे संबंध सुधारतील. मनाजोगी खरेदी करता येईल. कामाच्या ठिकाणी बदलीचे वारे वाहू लागतील. सर्वांशी मिळूनमिसळून वागाल.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर