Shukra Gochar September 2025: वैदिक ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहाची स्वतःची खासियत सांगितली आहे. त्यात शुक्र हा ऐश्वर्य, वैभव आणि संपत्ती देणारा ग्रह मानला जातो. शुक्राची स्वराशी म्हणजे तूळ. दर महिन्याला शुक्र एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो, मात्र जेव्हा तो स्वतःच्या स्वराशीत परततो, तेव्हा पृथ्वीवर अत्यंत शुभ राजयोग निर्माण होतात. असंच एक अद्भुत आणि लाभदायक संयोग यंदाच्या सप्टेंबर महिन्यात घडणार आहे. शुक्र तूळ राशीत प्रवेश करताच मालव्य राजयोग निर्माण होईल, तर सूर्य आणि बुध यांच्या युतीमुळे बुधादित्य राजयोगही तयार होणार आहे. हे दोन योग एकत्र येणे म्हणजे काही राशींसाठी अक्षरशः सुवर्णसंधी. या ग्रहयोगामुळे ३ राशींच्या जीवनात पैशांचा आणि यशाचा पाऊस पडणार आहे.

‘या’ राशींसाठी सुरू होणार गोल्डन टाइम!

तूळ

मालव्य आणि बुधादित्य राजयोगामुळे तूळ राशीच्या लोकांचा आत्मविश्वास प्रचंड वाढणार आहे. या काळात तुमचे भाग्य तुमच्या सोबत असेल. व्यक्तिमत्त्वात झळाळी येईल. करिअरमध्ये नवीन संधी मिळू शकेल. तुमची रखडलेली कामे लवकर पूर्ण होऊ शकतात. काहींना मोठ्या जबाबदाऱ्या सोपवल्या जातील. तुम्हाला पैसे मिळवण्याची संधी मिळू शकेल. आणि अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव मिळू शकतात. समाजात मान-सन्मान वाढेल.

कुंभ

शुक्राचा एक वर्षानंतर स्वराशीत परतण्याचा फायदा कुंभ राशीला भरभरून मिळणार आहे. तुमची गोड वाणी आणि संवाद कौशल्य तुमच्या यशाची गुरुकिल्ली ठरणार आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना चांगली नोकरी मिळू शकते. धार्मिक व आध्यात्मिक प्रवृत्तीकडे कल वाढेल. कुटुंबासह एखाद्या पवित्र स्थळी प्रवास घडू शकतो. तसेच, एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून अनपेक्षित मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला वडिलोपार्जित संपत्ती मिळू शकते. 

मकर

मकर राशीच्या लोकांसाठी तर जणू भाग्याचे दरवाजेच उघडणार आहेत. या काळात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. शुक्र प्रसन्न असल्याने करिअरमध्ये मोठा टप्पा गाठता येईल. व्यवसायिकांना मोठी ऑर्डर किंवा करार मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या निमित्ताने लांबचा प्रवास होईल, पण त्यातही आनंद मिळेल. जुन्या संपर्कांच्या जोरावर करिअरमध्ये झपाट्याने प्रगती होऊ शकेल. तुम्हाला वाहन सुख मिळू शकते. तुम्हाला मान-सन्मान मिळू शकतो.

थोडक्यात, सप्टेंबरच्या सुरुवातीपासून या ३ राशींसाठी काळ सोन्याचा ठरणार आहे. जर तुमची रास यामध्ये असेल, तर सज्ज व्हा पैशांचा, मान-सन्मानाचा आणि आनंदाचा तिहेरी वर्षाव तुमच्यावर होऊ शकतो.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)