Mercury Retrograde In Aries: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठरावीक काळानंतर राशी परिवर्तन करीत असतो. त्यात आता ग्रहांचा राजकुमार बुध हा बुद्धिमत्ता आणि वाणीचा कारक मानला जात; ज्याच्या राशी परिवर्तनामुळे प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर परिणाम होणार आहे. सध्या बुध मेष राशीत विराजमान आहे; पण २ एप्रिल रोजी बुध वक्री चाल कर करत मेष राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे काही राशींच्या लोकांना बुध ग्रहाच्या वक्री चालीमुळे विशेष लाभ मिळू शकतो; तर काही राशींच्या लोकांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. चला जाणून घेऊ की, बुध ग्रहाच्या उलट्या चालीमुळे कोणत्या राशींच्या लोकांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

मेष (Aries)

बुधाची प्रतिगामी गती ही मेष राशीच्याच लोकांसाठी नुकसानकारक ठरू शकते. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांनी विशेषत: पैशाशी संबंधित बाबींमध्ये थोडे सावध राहण्याची गरज आहे. कारण- अनावश्यक खर्चामुळे त्रास होऊ शकतो. त्याचबरोबर तुमच्या आयुष्यात अनेक चढ-उतार येऊ शकतात. आर्थिक योजनांबाबत थोडे सावध राहा. कुटुंबाबरोबर काही मुद्द्यांवरून वाद होऊ शकतो. त्यामुळे अनावश्यक अहंकार आणि रागावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा; अन्यथा नातेसंबंध बिघडू शकतात. भूतकाळातील काही गोष्टी वैयक्तिक आयुष्यात समोर येऊ शकतात. त्यामुळे तुमच्या भावनांवर थोडे नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा.

Shani Vakri 2024
जूनपासून हिऱ्यापेक्षाही जास्त चमकणार ‘या’ राशींचे नशीब? शनिदेव वक्री अवस्थेत बलवान होताच १३९ दिवस मिळू शकतो अपार पैसा
Lakshmi Narayan Rajyog and Budhaditya Rajyog
१०० वर्षांनी एकाचवेळी २ शुभ राजयोग घडणार; ९ एप्रिलपासून ‘या’ राशींना मिळणार बक्कळ पैसा? होऊ शकतात श्रीमंत
Malavya Rajyog 2024
एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात तयार होणार शुभ राजयोग; ‘या’ ४ राशींचे लोक होतील भाग्याचे धनी? नशिबाला मिळू शकते श्रीमंतीची कलाटणी
Shukra Guru Yuti
वाईट काळ संपेल! मे पासून ‘या’ राशी होणार गडगंज श्रीमंत? १२ वर्षांनंतर शुक्र-गुरूची युती होताच होऊ शकतात मालामाल

वृषभ (Taurus)

वृषभ राशीच्या लोकांसाठी बुधाची उलटी चाल फायदेशीर ठरू शकते; पण आर्थिक बाबतीत काही अडथळे निर्माण होऊ शकतात. या राशीच्या लोकांना विश्वासघाताचा सामना करावा लागू शकतो. सर्वांवर विश्वास ठेवणे टाळा. कोणीतरी तुमचा उपयोग स्वतःचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी करू शकतो. आर्थिक लाभातही काही प्रकारचे अडथळे येऊ शकतात. तसेच वैवाहिक जीवनातही समस्या निर्माण होऊ शकतात.

कन्या (Virgo)

बुध ग्रहाचे राशी परिवर्तन कन्या राशीच्या लोकांसाठीही तितकेसे फायदेशीर नाही. विशेषत: घर, करिअर व आर्थिक दृष्टिकोनातून हे परिवर्तन फारसे चांगले नाही, असे म्हटले जाते. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. कौटुंबिक जबाबदाऱ्यांचे ओझे तुमच्यावर पडू शकते. अशा परिस्थितीत जास्त पैसे खर्च होण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्हाला मानसिक आणि शारीरिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. नातेसंबंधांबद्दल बोलताना, तुम्ही स्वतःशी स्पष्टपणे संवाद साधू शकत नाही. त्यामुळे तुमच्यातील गैरसमज वाढू शकतात. व्यवसायातही पावले उचलताना सावधगिरी बाळगा. कारण- नुकसान होण्याची शक्यता जास्त आहे. तुमच्या आरोग्याबाबतही थोडे जागरूक राहण्याचा प्रयत्न करावा लागेल.