Budh Uday In Meen 2024: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह ठराविक काळानंतर काही ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी काही ग्रहांचा उदय आणि अस्त होतो. यापैकी एक ग्रह म्हणजे बुध. बुध ग्रहाच्या उदय आणि अस्ताचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर होतो. ग्रहांचा राजकुमार बुध ग्रहाचा आज शुक्रवारी उदय झाला आहे. मीन राशीत ग्रहांचा राजकुमार बुध ग्रहाचा उदय झाला आहे. बुध ग्रहाच्या उदयाचा सर्व राशीच्या लोकांवर परिणाम होईल. पण ४ राशी आहेत ज्यावर बुध ग्रहाची विशेष कृपा असणार आहे. जाणून घेऊया या चार राशी कोणत्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘या’ राशींचे आजपासून भाग्य उजळणार?

मेष राशी

मीन राशीत बुधाच्या उदयामुळे मेष राशीच्या लोकांना अनेक फायदे होऊ शकतात. तुम्हाला तुमच्या कामात यश मिळण्याची शक्यता आहे. लाभाचे नवीन स्त्रोत निर्माण होतील ज्यामुळे आर्थिक स्थिती सुधारु शकते. समाजात मान-सन्मान वाढू शकतो. व्यावसायिकांना फायदा होऊ शकतो. नवीन डील मिळू शकते. नोकरदारांसाठीही हा काळ चांगला ठरु शकतो.

(हे ही वाचा : होळीपासून ‘या’ राशींना मिळणार प्रचंड पैसा? ‘महालक्ष्मी राजयोग’ बनल्याने नशिबाला कलाटणी देत होऊ शकतो धन वर्षाव)

वृषभ राशी

वृषभ राशीच्या लोकांसाठी बुधाचा उदय लाभदायी ठरु शकतो. नोकरीच्या ठिकाणी प्रगती होण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊन आर्थिक स्थिती सुधारु शकते. कोणत्याही कामात अडथळे असतील तर ते दूर होऊ शकतात. अचानक मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे.

मिथुन राशी

मिथुन राशीच्या लोकांसाठी बुधाचा उदय खूप फायदेशीर ठरु शकतो. नोकरदार लोकांना प्रमोशन मिळू शकते. व्यावसायिकांसाठी हा काळ चांगला ठरु शकतो. नफा मिळविण्याची हीच योग्य संधी असू शकते. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना चांगली बातमी मिळू शकते. कौटुंबिक संबंध आणखी मजबूत होऊ शकतात.

सिंह राशी

सिंह राशीच्या लोकांचे आजपासून सोनेरी दिवस सुरू होऊ शकतात. नोकरदार लोकांना नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जाऊ शकतात ज्या तुम्ही पूर्ण करण्यात यशस्वी होऊ शकता. व्यावसायिकांसाठीही काळ चांगला ठरु शकतो. जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला चांगले परिणाम मिळू शकतात. नोकरीच्या ठिकाणी प्रगतीची शक्यता आहे.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mercury rise 0 4 budh planet uday in meen these zodiac sign get more profit and money pdb 95
First published on: 15-03-2024 at 11:15 IST