Mercury Transit In Ashwini Nakshatra: ग्रह राशी परिवर्तनाच त्यांच्या नक्षत्रामध्येदेखील बदल करतात. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी राशी आणि नक्षत्रही बदलतात, ज्याचा परिणाम मानवी जीवनावर होत असतो. ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या राजकुमाराचे स्थान बुध ग्रहाला आहे. नवग्रहांपैकी एक असलेला बुध हा बुद्धिमत्ता, व्यवसाय, तर्कशास्त्र, गणित, संवाद, हुशारी, भाषण, संवाद, मैत्री इत्यादींसाठी जबाबदार आहे. एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी त्याला एक महिना लागतो. नवग्रहांमध्ये बुधाचे संक्रमण अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. बुध ग्रहाच्या कृपेने एखाद्या व्यक्तीमध्ये अनेक उत्कृष्ट कौशल्ये निर्माण होतात. त्यामुळे व्यक्तीला जीवनाच्या अनेक क्षेत्रांत यश मिळविण्यात मदत होते, असे मानतात. वैदिक पंचांगानुसार ७ मे रोजी बुध ग्रह मेष राशीत प्रवेश करणार आहे. त्यासोबतच याच दिवशी बुध पापी ग्रह केतूच्या नक्षत्रात प्रवेश करणार आहे. बुध ग्रह पहाटे ४ वाजून १३ मिनिटांनी अश्विनी नक्षत्रात प्रवेश करणार आहे. यावेळी बुध ग्रहाच्या नक्षत्रबदलामुळे काही राशींचे भाग्य उजळू शकेल. जाणून घेऊ कोणत्या राशींना हा लाभ होऊ शकतो.

‘या’ राशींना होणार धनलाभ?

मेष

बुध ग्रहाचे नक्षत्र गोचर मेष राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. व्यवसायातून मोठा नफा मिळू शकतो. या काळात या राशीच्या लोकांची रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होण्याची शक्यता आहे. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. या राशीच्या लोकांना कारकिर्दीत अनेक मोठे फायदे पाहायला मिळू शकतात. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळाल्याने तुमचा आत्मविश्वास वाढू शकतो. तुमच्या मेहनत आणि प्रयत्नांमुळे कंपनीला फायदा मिळू शकतो.

सिंह

बुधाचा नक्षत्रबदल सिंह राशीच्या लोकांसाठी शुभ ठरू शकतो. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. तुम्हाला या काळात फायदा होऊ शकतो. तुमचा पगार वाढण्याची शक्यता आहे. तुमच्या कामाचे कौतुक होऊ शकते. बुधदेवाच्या कृपेने तुम्हाला तुमच्या कष्टाचे फळ मिळू शकेल. या काळात तुम्हाला वेळोवेळी अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. आर्थिक परिस्थिती चांगली राहू शकते. वैवाहिक जीवनात सुरू असलेल्या समस्याही संपू शकतात. घरात शांती आणि आनंद नांदू शकतो.

तूळ

बुधाचा नक्षत्रबदल तूळ राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकतो. या लोकांचे चांगले दिवस सुरू होऊ शकतात. या काळात व्यवसायात तुमची चांगली प्रगती होऊ शकते. तुमची प्रलंबित असलेली कामे लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे. दीर्घकाळापासून प्रतीक्षेत असलेली बढती मिळू शकते. नव्या नोकरीच्या संधी चालून येऊ शकतात. तुमचे अडकलेले पैसे लवकरच तुमच्या हाती येऊ शकतात. अविवाहितांना काहीतरी चांगली बातमी मिळू शकते. तुमच्या आयुष्यात आनंद तुमच्या दारावर ठोठावू शकतो.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)