ज्योतिष शास्त्रानुसार, बुद्धिमत्ता, व्यवसाय आणि वाणीचा कारक बुध ग्रह १८ मार्च रोजी कुंभ राशीत स्थिर झाला आहे. यानंतर २४ मार्च २०२२ रोजी बुध राशी बदलणार असून मीन राशीत प्रवेश करेल. जिथे सूर्य देव आधीच उपस्थित असतो. सूर्य आणि बुध यांच्या संयोगाने बुधादित्य योग तयार होईल. बुधाच्या राशीतील बदलामुळे काही राशींच्या लोकांच्या जीवनात महत्त्वपूर्ण बदल घडतील. कोणत्या आहेत त्या राशी जाणून घेऊयात…..

वृषभ राशी

बुद्धादित्य योगामुळे या राशीच्या लोकांची मानसिक शांती भंग होऊ शकते. अशा वेळी मानसिक शांतीसाठी प्रयत्न करावे लागतात. नोकरीत विशेष बदलाचे योग येतील. आर्थिक नुकसान होऊ शकते. जीवनशैलीत बदल होईल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराशी चांगले संबंध ठेवावे लागतील.

कर्क राशी

या राशीच्या लोकांचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. तसेच या राशीच्या लोकांना रागापासून दूर राहावे लागेल. तर नोकरीत बाहेरच्या व्यक्तीवर विश्वास ठेवू नका. दरम्यान या लोकांना आर्थिक गुंतवणुकीत नुकसान होऊ शकते. बुध परिवर्तनाच्या काळात आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. जीवन साथीदारासोबत मतभेद होऊ शकतात.

मिथुन राशी

बुधाचा हा राशी बदल मिथुन राशीसाठी फायदेशीर ठरणार आहे. व्यवसायात लाभ होण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक स्थिती सुधारू शकते. करिअरमध्ये चांगले बदल होतील.

तूळ राशी

बुधाच्या राशी बदलामुळे कौटुंबिक जबाबदारी वाढेल. तसेच या राशी परिवर्तनाच्या काळात मन अस्वस्थ राहू शकते. तसेच या राशीच्या लोकांना आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. याशिवाय व्यवहारात सावध राहावे लागेल. धनहानी होऊ शकते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वृश्चिक राशी

बुध राशीच्या बदलामुळे या राशीच्या लोकांचे मन विचलित होऊ शकते. आरोग्याबाबत काळजी घ्यावी लागेल. नोकरीत अतिरिक्त काम मिळू शकते. कुटुंबात वाद होऊ शकतो. नोकरीत बदलाचे योग आहेत. तुम्हाला काही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. बुधाच्या संक्रमणादरम्यान तुम्हाला संयम ठेवावा लागेल.