Dainik Rashi Bhavishya In Marathi, 30 June 2025: ३० जून २०२५ रोजी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथी आहे. पंचमी तिथी ९ वाजून २५ मिनिटांपर्यंत असेल, त्यानंतर षष्टी तिथी सुरु होईल. संध्याकाळी ५ वाजून २१ मिनिटांपर्यंत सिद्धी योग जुळून येईल. ८ वाजून ५४ मिनिटांपर्यंत पूर्वाफाल्गुनी नक्षत्र जागृत असणार आहे. राहू काळ ७:३० वाजता सुरु होईल ते ९ वाजेपर्यंत असणार आहे. तसेच आज स्कंद षष्ठी व्रत केले जाणार आहेत. दर महिन्याच्या शुक्ल पक्षातील षष्ठी तिथीला स्कंद षष्ठी व्रत केले जातात. स्कंद षष्ठीचा दिवस भगवान कार्तिकेय यांना समर्पित आहे. या दिवशी दानधर्म करण्याचेही विशेष महत्त्व आहे. या दिवशी दान केल्याने भगवान कार्तिकेय प्रसन्न होतात आणि सर्व रखडलेली किंवा बिघडलेली कामे पूर्ण होतात.

३० जून २०२५ आजचे राशिभविष्य (Today Horoscope in Marathi, 30 June 2025 )

आजचे मेष राशिभविष्य (Aries Horoscope In Marathi)

जोडीदाराच्या सहवासात रमून जाल. नवीन ओळखी होतील. चारचौघात तुमचे कौतुक केले जाईल. भागिदारीतून चांगला लाभ मिळेल. कामानिमित्त प्रवास घडेल.

आजचे वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope In Marathi)

दिवस आनंदात जाईल. नवीन कामात हात घालाल. केलेल्या कामातून समाधान मिळेल. सहकार्‍यांकडून कौतुक केले जाईल. कामे योग्य वेळेत पूर्ण करता येतील.

आजचे मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope In Marathi)

करमणुकीत अधिक वेळ घालवाल. मुलांच्या आनंदात सहभागी व्हाल. संभाषणाची आवड जोपासली जाईल. बुद्धी चातुर्यावर खुश राहाल.

आजचे कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope In Marathi)

घरातील वातावरण खेळीमेळीचे राहील. कामाचा यथायोग्य आनंद मिळेल. सर्वांना प्रेमाने आपलेसे कराल. सर्वांशी मिळूनमिसळून वागाल. जवळच्या निसर्गरम्य ठिकाणी भेट द्याल.

आजचे सिंह राशिभविष्य (Leo Horoscope In Marathi)

प्रवास हसत-खेळत पार पडेल. जवळचे मित्र भेटतील. दिवस आनंदात जाईल. अधिकार्‍यांशी सल्लामसलत कराल. तरुण वर्गाशी मैत्री कराल.

आजचे कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope In Marathi)

कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील. सर्व गोष्टींचा सारासार विचार कराल. काही कामांचे मनन कराल. महत्त्वाची कागदपत्रे पुढे सरकतील. कमिशन मधून चांगला धनलाभ होईल.

आजचे तूळ राशिभविष्य (Libra Horoscope In Marathi)

दिवस आपल्या मनाप्रमाणे घालवाल. आवडत्या गोष्टी करण्यावर भर द्याल. लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. प्रवासात क्षुल्लक अडचण येऊ शकते. नातेवाईक तुमच्यावर नाराज होऊ शकतात.

आजचे वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope In Marathi)

मनात चलबिचलता जाणवेल. ठाम निर्णय घ्यावे लागू शकतात. धार्मिक कामात मन गुंतवावे. मानसिक शांततेसाठी ध्यानधारणा करावी. नवीन संधी उपलब्ध होतील.

आजचे धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope In Marathi)

पारमार्थिक कामात मदत कराल. प्रवासात काळजी घ्यावी लागेल. स्वत:मध्ये काही बदल करून पहावेत. नातेवाईकांशी सलोखा वाढवावा. अनाठायी खर्च होण्याची शक्यता.

आजचे मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope In Marathi)

कामातील अडचणी दूर होतील. मुलांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे. स्वत:वरील खर्च वाढू शकतो. घरात काही बदल करावे लागू शकतात. वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे.

आजचे कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope In Marathi)

शब्दांची धार थोडी कमी करावी लागेल. परोपकाराची जाणीव ठेवून वागाल. गरज नसताना वस्तु खरेदी केल्या जातील. टापटि‍पेवर अधिक वेळ घालवाल. स्वभावात काहीसा उधळेपणा येईल.

आजचे मीन राशिभविष्य (Pisces Horoscope In Marathi)

शेअर्स मधून धनलाभ संभवतो. वारसाहक्काच्या कामातून कमाई सुधारेल. अडचणींवर मात करता येईल. पित्त विकाराचा त्रास संभवतो. किरकोळ जखमांपासून काळजी घ्यावी लागेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर