19th February Horoscope Marathi: आज १९ फेब्रुवारी, सोमवार पंचांग : काही राशींना आज दिवसभर तब्येतीच्या कुरबुरी जाणवू शकतात. तर काहींची आज चंचल मानसिकता राहील. कसा जाईल सर्व राशींना आठवड्याचा पहिला दिवस, जाणून घ्या.

मेष:-मानसिक चंचलता जाणवेल. लहानांशी मैत्री कराल. जवळचा मित्र परिवार गोळा कराल. अभ्यासू लोकांच्यात वावराल. जुन्या कामातून धनलाभ संभवतो.

वृषभ:-तुमच्यातील हरहुन्नरीपणा दिसून येईल. योग्य ठिकाणी कल्पकता दाखवावी. कमिशन मधून मिळणार्‍या लाभाकडे लक्ष राहील. व्यवसायाचे सखोल ज्ञान घ्यावे. व्यवहार चातुर्य ठेवावे लागेल.

मिथुन:-गोड बोलण्याचा फायदा होईल. अंगीभूत कलेचे मूल्यमापन केले जाईल. लिखाणास प्रसिद्धी मिळेल. प्रवासाची आवड पूर्ण होईल. शिस्तप्रियता दाखवाल.

कर्क:-कफ विकाराचा त्रास जाणवू शकतो. स्मरण शक्तीला ताण द्यावा. दिवसभर विचारात गर्क राहाल. तुमच्या अनुमानास निश्चिती येईल. इतरांना स्वेच्छेने मदत कराल.

हेही वाचा : पुढील ३ महिन्यात ‘या’ राशी होणार प्रचंड श्रीमंत? १२ वर्षांनी देवगुरु गोचर करताच घरात येऊ शकतो चांगला पैसा

सिंह:-व्यावहारिक कुशलता दाखवावी लागेल. व्यापारात चांगला फायदा होईल. जोडीदाराशी गप्पा गोष्टी कराल. दुचाकी वाहन चालवताना सतर्कता बाळगावी. कामातून समाधान शोधाल.

कन्या:-इतरांचा विश्वास संपादन करावा. जुन्या गोष्टी उकरून काढू नका. मनातील चुकीचे विचार बाजूस सारावेत. नसत्या भांडणात पडू नका. त्वचा विकार जाणवू शकतात.

तूळ:-कलात्मक दृष्टीकोन ठेवाल. प्रत्येक गोष्टींत आनंद शोधाल. नवीन गोष्टी जाणून घेण्याची इच्छा दर्शवाल. जरूर नसतांना उदारपणे वागू नका. डोळ्यांचे त्रास संभवतात.

वृश्चिक:-गोड बोलून कार्यभाग साधता येईल. जवळचे नातेवाईक भेटतील. मित्रा परिवाराबरोबर गप्पांत रमाल. उष्णतेचा त्रास संभवतो. महत्वाकांक्षा वाढीस लागेल.

धनू:-काही गोष्टींचे चिंतन करावे. योग्य तर्क वापरावा लागेल. वक्तृत्वाची संधी चालून येईल. पारंपरिक कामातून लाभ संभवतो. बुद्धिमत्तेची चुणूक दाखवाल.

मकर:-आर्थिक उन्नतीचा विचार कराल. व्यवहारी बुद्धिमत्तेने वागणे ठेवाल. हसत खेळत कामे कराल. काही कामे अकारण रेंगाळतील. घेतलेल्या ज्ञानाचा सदुपयोग कराल.

कुंभ:-स्मरणशक्तीला चालना दिली जाईल. काही ठिकाणी धूर्तपणा वापरावा लागेल. सगळीकडे बारीक नजर ठेवाल. तत्परतेने कामे कराल. आवडीचे पदार्थ खायला मिळतील.

मीन:-कर्ज प्रकरणे तूर्तास दूर ठेवावीत. थोरांचा सल्ला घ्यावा. वरिष्ठांची मर्जी राखावी. व्यावसायिक ज्ञान गोळा कराल. दिवसभर चंचलता जाणवेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर