Aajche Rashi Bhavishya 29 July 2025 In Marathi : आज २९ जुलै २०२५ रोजी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथी आहे. पंचमी तिथी रात्री १२ वाजून ४७ मिनिटांपर्यंत असणार आहे. रात्री ३ वाजून ५ मिनिटांपर्यंत शिव योग जुळून येईल. संध्याकाळी ७ वाजून २८ मिनिटांपर्यंत उत्तरा फाल्गुनी नक्षत्र जागृत असणार आहे. आज राहू काळ ७:३० वाजता सुरु होईल ते ९ पर्यंत असणार आहे. यंदा २५ जुलै रोजी श्रावणमास सुरु होत आहे. तर पहिली मंगळागौर २९ जुलै रोजी म्हणजे आज पुजली जाईल आणि नागपंचमीचाही सण देखील साजरा केला जाईल. तर आजचा शुभ दिन तुमच्या राशीसाठी कसा असणार जाणून घेऊया…
२९ जुलै २०२५ पंचांग व राशिभविष्य (Today Horoscope In Marathi, 29 July 2025)
आजचे मेष राशिभविष्य (Aries Horoscope In Marathi)
वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील. निसर्ग सौंदर्याबद्दल ओढ वाढेल. मन काहीसे विचलीत राहील. आत्मविश्वास कायम ठेवावा. सामाजिक भान राखून वागाल.
आजचे वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope In Marathi)
व्यवसायात भागीदाराचा सल्ला महत्त्वाचा ठरेल. अनावश्यक खर्च टाळावा. उत्साहवर्धक घटना घडतील. जोडीदाराशी प्रेमळ वार्तालाप कराल. मैत्रीचे संबंध सुधारण्यासाठी वाव मिळेल.
आजचे मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope In Marathi)
कामाची धांदल वाढू शकते. काही अनपेक्षित बदल संभवतात. सकारात्मक दृष्टिकोन बाळगावा लागेल. जोडीदाराला तुमच्या प्रती आदर वाटेल. अनावश्यक खर्च टाळावा.
आजचे कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope In Marathi)
मुलांशी मतभेद संभवतात. व्यावसायिक प्रश्न प्राधान्याने सोडवावेत. मानसिक अस्थिरता टाळावी लागेल. आळस बाजूला सारून कार्यमग्न रहा. आवडते पुस्तक वाचाल.
आजचे सिंह राशिभविष्य (Leo Horoscope In Marathi)
धार्मिक गोष्टींकडे ओढ वाढेल. सकारात्मकतेने वावराल. मनातील इच्छा पूर्ण होईल. हातापायास किरकोळ इजा संभवते. नवीन वस्तु खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होईल.
आजचे कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope In Marathi)
खूप दिवसांनी जवळच्या मित्राची गाठ पडेल. जोडीदाराला प्रेमाने खुश कराल. तरुणांचे विचार जाणून घ्याल. कलाकारांना काही तरी नवीन करण्याची संधि मिळेल. केलेली धावपळ लाभदायक ठरेल.
आजचे तूळ राशिभविष्य (Libra Horoscope In Marathi)
रागावर अंकुश ठेवावा. कामानिमित्त अचानक प्रवास करावा लागेल. प्रिय व्यक्तीच्या होकाराची मनात आस धराल. मन काहीसे विचलीत राहील. कामाच्या ठिकाणी विरोधाला सामोरे जावे लागू शकते.
आजचे वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope In Marathi)
सारासार विचार करण्यावर भर द्यावा. आत्मविश्वास कमी पडू देऊ नका. मुलांशी मतभेदाचे प्रसंग येऊ शकतात. कामाच्या ताणाचा परिणाम जाणवेल. जुने वाद मिटवावेत.
आजचे धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope In Marathi)
प्रिय व्यक्तीच्या मनातील गैरसमज दूर कराल. दिवस काहीसा अनुकूल राहील. रखडलेली कामे मार्गी लावाल. दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल. बौद्धिक चकमक टाळावी.
आजचे मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope In Marathi)
कामातील उत्साह कमी पडू देऊ नका. भावंडांची मदत मिळेल. मनावरील दडपण कमी होईल. घरात अधिकारवाणीने वावराल. तुमच्या लोकप्रियतेत वाढ होईल.
आजचे कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope In Marathi)
अडचणीतून मार्ग काढता येईल. मित्रांचे मोलाचे सहकार्य लाभेल. महिला वर्ग करमणुकीत रमेल. विरोधकांवर मात करता येईल. पित्त प्रकृतीत वाढ होऊ शकते.
आजचे मीन राशिभविष्य (Pisces Horoscope In Marathi)
कटू बोलणे टाळा. एकतर्फी विचार करू नका. हितशत्रू पासून सावध रहा. उधारीचे व्यवहार टाळा. स्पर्धेत यश मिळेल.
ज्योतिषी विद्याधर करंदीकर